Tokyo Paralympics 2020: नोएडाचे डीएम सुहास यथिराज यांनी अंतिम फेरीचा सामना गमावला, रोप्य पदकावर कोरले नाव
38 वर्षीय आयएएस अधिकारी भारतासाठी रौप्य पदक (Silver Medal) जिंकण्यात यशस्वी झाले आ
टोकियो पॅरालिम्पिकच्या (Tokyo Paralympics) शेवटच्या दिवशी नोएडाच्या डीएमने (Noida DM) वर्चस्व गाजवले. 38 वर्षीय आयएएस अधिकारी भारतासाठी रौप्य पदक (Silver Medal) जिंकण्यात यशस्वी झाले आहे. भारताचा पॅरा शटलर सुहास यथिराज (shuttler Suhas Yathiraj) पुरुषांच्या बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेच्या एसएल 4 प्रकारात सुवर्णपदकाचा सामना गमावला. त्याने सुवर्णपदकासाठी फ्रान्सच्या लुकास मजूरशी रोमांचक आणि कठीण सामना केला, ज्यामध्ये त्याला 21-15, 17-21, 15-21 असे पराभूत व्हावे लागले. अगदी सुरुवातीपासूनच फ्रान्सच्या लुकास मजूरला सुवर्णपदकाची लढत जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. याला सुद्धा एक कारण होते. खरं तर, त्याने यापूर्वीच टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजला पराभूत केले होते. याशिवाय त्याचे रँकिंग देखील पहिल्या क्रमांकावर होते.
फायनल जिंकून सुहासला आधीच्या पराभवाचा बदला घेण्याची प्रत्येक संधी होती. पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि त्यामुळे रौप्य पदक सुवर्णाने रंगवता आले नाही. भारताच्या सुहास यथीराज आणि फ्रान्सच्या लुकास मजूर यांच्यात बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकासाठी रोमांचक लढत झाली. हे युद्ध 3 गेममध्ये संपले. पहिला सामना भारतीय पॅराशूटलरकडे गेला. जे त्यांनी 21-15 ने जिंकले. त्याच्या विजयाने करोडो भारतीयांच्या आकांक्षांना नवे आकाश दिले.
यानंतर, जेव्हा तो दुसऱ्या गेममध्येही आघाडी घेताना दिसला. तेव्हा असे वाटले की आता भारताच्या बॅगेत सोने पडण्याची खात्री आहे. पण त्यानंतर फ्रेंच पॅरा-शटलरने आपला गेम बदलून दुसरा गेम 21-17 असा जिंकला. आता सर्व जबाबदारी तिसऱ्या आणि अंतिम सामन्यावर आली. हा खेळ जिंकणे म्हणजे सुवर्णपदक काबीज करणे, जे सुहास यतीराज करू शकले नाही. तिसऱ्या गेममध्ये सुहासचा 21-15 असा पराभव झाला.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहासने जिंकलेले रौप्य हे भारतासाठी बॅडमिंटनमधील दुसरे मोठे पदक आहे. याआधी प्रमोद भगतने देशासाठी सुवर्ण जिंकले आहे. सुहास प्रमाणे, टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी आणखी एक भारतीय पदकाची आशा होती. तो म्हणजे तरुण ढिल्लन. देशाला तरुणाकडून कांस्य पदकाची अपेक्षा होती. पण त्याला या लढतीत इंडोनेशियन आव्हानाचा सामना करता आला नाही. त्याने सरळ गेममध्ये 17-21, 11-21 असा सामना गमावला. आता बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकण्याची शेवटची भारतीय आशा कृष्णा नगरच्या रूपात उरली आहे.