Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्सच्या समारोप समारंभात निखत जरीन आणि शरथ कमल यांची ध्वजवाहक म्हणून निवड

यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशाला सुवर्णपदक (Gold medal) मिळवून दिले.

Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games) 2022 चा शेवटचा दिवस सोमवारी आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशाला सुवर्णपदक (Gold medal) मिळवून दिले. टीम इंडियाला 18 सुवर्णपदके मिळाली आहेत. यासह भारतीय खेळाडूंनी एकूण 55 पदके जिंकली आहेत. आता राष्ट्रकुल स्पर्धा समारोप समारंभाकडे वाटचाल करत आहेत. यासाठी भारताने निखत जरीन (Nikhat Zarin) आणि शरथ कमल (Sharath Kamal) यांची ध्वजवाहक म्हणून निवड केली आहे. बॉक्सिंगमध्ये निखतने सुवर्णपदक पटकावले आहे. तर शरथने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप समारंभ बर्मिंगहॅम येथील अलेक्झांडर स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. अनेक दिग्गज कलाकार यात परफॉर्म करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी भारतातून निखत झरीन आणि शरत कमल यांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. निखतने बॉक्सिंगमध्ये तर शरथने टेबल टेनिसमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. हेही वाचा Commonwealth Games 2022: PV Sindhu ला Badminton Women's Singles मध्ये सुवर्णपदक; Michelle Li वर मात

बॉक्सिंगमधील महिलांच्या लाइटफ्लाय प्रकाराच्या अंतिम फेरीत निखतने उत्तर आयर्लंडच्या कार्ले मॅकनॉलचा 5-0 असा पराभव केला. अशा प्रकारे त्याने सुवर्णपदक जिंकले. तर शरथ कमलने टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने अंतिम फेरीत श्रीजा अकुलासह सुवर्णपदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात मलेशियाच्या जोडीचा पराभव करत विजय मिळवला.