IPL 2021: मुंबई इंडियन्सचे खेळाडू पोहोचले अबू धाबीमध्ये, सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी फोटो केला शेअर
आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे (Mumbai indians) तीन खेळाडू रोहित शर्मा (Rohit sharma), जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव चार्टर विमानाने अबू धाबीला (Abu Dhabi) पोहोचले आहेत.
टीम इंडिया आणि इंग्लंडविरुद्धचा (IND vs ENG) मँचेस्टरमधील शेवटचा कसोटी सामना (Test Match) रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे (Mumbai indians) तीन खेळाडू रोहित शर्मा (Rohit sharma), जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव चार्टर विमानाने अबू धाबीला (Abu Dhabi) पोहोचले आहेत. तीन खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह यूएईला (UAE) घेऊन जाण्यासाठी मुंबई इंडियन्सने एक चार्टर विमान दिले होते.आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या खेळाडूंना यूएईमध्ये 6 दिवस क्वारंटाईनमध्ये (Quarantine) राहावे लागेल. खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR test) मँचेस्टरहून अबू धाबीला जाण्यापूर्वी केली गेली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये उतरल्यानंतरही चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही वेळा चाचणीचे निकाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचवेळी 6 दिवसांच्या क्वारंटाईननंतर खेळाडू यूएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी सराव सुरू करू शकतात.
रोहित शर्माची पत्नी रितिका आणि मुलगी समैरासोबत एक छायाचित्र पोस्ट केले. त्याचबरोबर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर आयपीएल संघांनी आपल्या खेळाडूंना यूएईमध्ये आणण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंना लवकरात लवकर यूएईमध्ये आणायचे आहे. सर्व खेळाडू खासगी विमानाने यूएईला पोहोचत आहेत. म्हणूनच यूएईमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना 6 दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे. हेही वाचा IPL 2021: जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांची आयपीएल 2021 मधून माघार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ECB) यांनी मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण असे देण्यात आले की भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय शिबिरात कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली.
आयपीएल 2021 च्या यूएई लेगच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे . आयपीएलचे दुसरे सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जे दोघेही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करतात. ते लंडनहून चार्टर फ्लाईटवर इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला पोहोचतील. हे दोघे रविवारी सकाळी दुबईला त्यांच्या फ्रँचायझीने आयोजित केलेल्या विमानाने पोहोचतील