महाराष्ट्राचा प्रो-कबड्डी स्टार काशिलिंग अडके याला घरी जुगार आणि दारूचा अड्डा चालवल्या प्रकरणी अटक

प्रो-कबड्डी (Pro Kabbadi) मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा कबड्डीपटू काशिलिंग अडके याला पोलिसांनी त्याच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील राहत्या घरात जुगार आणि दरीचा अड्डा चालवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Mahrashtra Pro Kabbadi Star Kashiling Adake (Photo Credits: Twitter)

प्रो-कबड्डी (Pro Kabbadi) मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा मातब्बर  कबड्डीपटू काशिलिंग अडके (Kashiling Adake) याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी दुर्दैवाने हे नाव जुगार आणि दारूचा अड्डा चालवणाऱ्या गुन्हेगाराच्या रूपात समोर आले आहे. काशिलिंग याला पोलिसांनी त्याच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील राहत्या घरात जुगार आणि दरीचा अड्डा चालवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. काशिलिंग सोबतच अन्यही आठ जण यामध्ये सहभागी होते. काशिलिंग याच्या घरावर छापा मारून पोलिसांनी 1 लाख 65 हजाराचा माल जप्त केल्याचे समजतेय. सोमवार, 13 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जारी असताना अशा प्रकारे लोकांना जमवण्यासाठी सुद्धा काशीलिंगवर कारवाई होऊ शकते.  IPL 2020: लॉकडाऊन वाढीनंतर पुढील आदेश येईपर्यंत आयपीएल रद्द, बीसीसीआय सूत्रांची माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, काशिलिंग अडके हा काही स्थानिक मित्रांच्या सोबत मिळून आपल्याच घरात हा अड्डा चालवत होता,पोलिसांचा छापा पडताच यातील अनेकांनी पळून जाण्याचा पृयत्न केला पण पोलिसांनी चपळाईने या सर्वांना जेरबंद केले आहे. यातील अन्य आठ जनाची नावे पांडुरंग पाटसुते, आरिफ मुल्ला, अतुल परीट, रसिक नायकवडी, हर्षल पाटील, जोतिराम पाटील अशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकल, विदेशी दारु असा 1 लाख 61 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, काशिलिंग अडकेले हे प्रो-कबड्डी सत्रातील गाजलेले नाव आहे. दुसऱ्या सीझन मध्ये दिल्लीच्या टीममधून खेळताना काशिलिंगला सर्वोत्तम चढाईपटूचा मान मिळाला होता. दुर्दैवाने त्याला मागच्या सीझन मध्ये खरेदी केले गेले नाही. यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली आणि त्यातच तो व्यसनाच्या आहारी गेला. त्याला दारु आणि जुगाराचं व्यसन लागलं. हळू हळू तो आता स्वतःच जुगाराचा अड्डा चालवू लागला होता.