IPL 2023: जॉनी बेअरस्टो आयपीएल 2023 मधून बाहेर, पंजाब किंग्सने व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण
पंजाबने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सुरू होणार आहे. याआधी पंजाब किंग्जला (Punjab Kings) मोठा धक्का बसला. संघाचा अनुभवी जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) या मोसमात खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे तो मैदानात उतरणार नाही. पंजाब किंग्जच्या बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅट शॉर्टचा (Matt Short) संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. पंजाब किंग्जचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी मोहाली येथे होणार आहे.
याआधी संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा अनुभवी जॉनी बेअरस्टो या मोसमातून बाहेर आहे. दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर आहे. पंजाबने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. संघाने बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅट शॉर्टचा संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅट शॉर्ट हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. मात्र अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण करता आलेले नाही. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याचा विक्रम चांगला आहे.
शॉर्टने 67 टी-20 सामन्यात 1409 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. शॉर्टने लिस्ट ए चे 55 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 1390 धावा केल्या आहेत. शॉर्टने या फॉरमॅटमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 14 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 2445 धावा केल्या आहेत.