IPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात
दोन वेळा चॅम्पीयन ठरलेल्या कोलकाता संघाने आयपीएलमध्ये गेल्या वेळचा (2014) चषक गौतम गंभीर याच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यानंतर संघाने गेल्या चार वर्षांमध्ये तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. मात्र, या संघाला अंतिम विजयाला मात्र गवसणी घालता आली नाही. त्यामुळे यंदा हा संघ कशी कामगिरी करतो याबाबत मोठी उत्सुकता आहे.
IPL 2019, KKR vs SRH match 2: इंडियन प्रिमियर लिग (Indian Premier League) अर्थातच IPL 2019 स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील दुसरा सामना आज कोलकाता येथील इडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळला जात आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि केन विल्यम्सन (Kane Williamson) याच्या नेतृत्वाखालील सनराजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाणेफेक झाली असून, नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्स या संघाने मैदानात गोलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी मैदानात असलेल्या संघाचे विश्लेषण करायचे तर, दोन वेळा चॅम्पीयन ठरलेल्या कोलकाता संघाने आयपीएलमध्ये गेल्या वेळचा (2014) चषक गौतम गंभीर याच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यानंतर संघाने गेल्या चार वर्षांमध्ये तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. मात्र, या संघाला अंतिम विजयाला मात्र गवसणी घालता आली नाही. त्यामुळे यंदा हा संघ कशी कामगिरी करतो याबाबत उत्सुकता आहे.
कोलकाता नाईट रायडर्स वैशिष्ट्ये
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचे तर, संघात सुनील नरेन, कुलदीप यादव आणि पीयूष चावला, के सी करीअप्पा यांच्यासारखे अनुभावी खेळाडू आहेत. जे संघाला मजबूत स्थान देऊ शकतात. शिवम मावी आमि दक्षिण अफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्टजे याच्या दुखापतीच कमी संघाला जरूर भासणार आहे. तर, क्रिस लिन, शुभमन गिल, रोबिन उथप्पा, आंद्रे रसेल, कार्तिक आणि कालरेस ब्रैथवेट यांच्यासारखे स्फोटक फलंदाज ही मजबूत धावसंख्या उभारण्यासाठी संघाची जमेची बाजू असणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद महत्त्वाचे मुद्दे
दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद संघाला मागच्या वेळी चन्नई सुपर किंग्ज संघाकडून 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तोही फायनल सीजनमध्ये. सध्या केन विल्यम याच्या नेतृत्वाखाली असलेल्या हैदराबाद संघाने 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली चषक जिंकण्यासाठी दमदार खेळी केली होती. दरम्यान, आज (रविवार 24 मार्च 2019) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात सर्वाच्या नजरा या वार्नर याच्यावर असतील. कारण, चेंडूशी छेडछाड (बॉल टेम्परिंग) केल्यानंतर एक वर्षाची बंदीची शिक्षा पूर्ण करुन तो पहिल्यांदाच मैदानात उतरला आहे. हैदराबाद संघाकडे वार्नर आणि विल्यम यांच्याशिवाय मार्टिन गुप्टिल, मनीष पांडे आणी यूसुफ पटाण यांच्यासारखे चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा आहे. दरम्यान, सलामीविर शिखर धवन याची संघाला कमी नक्कीच जानवणार आहे. कारण, तो आात दिल्ली कॅपीटल्स संघाकडून खेळतो आहे. राखिद खान, बिली स्टेनलेक, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि बासिल थम्पी आदी मंडळींवर गोलंदाजीची धुरा असणार आहे.
दोन्ही संघातील खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, जो डेनली, लॉकी फग्र्यूसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हैरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नीतीश राणा, संदीप वॉरियर, केसी करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाइक, पृथ्वी राज आणि प्रसिद्ध कृष्णा.
सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), डेविड वार्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम , टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, राशिद खान, रिद्धिमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन आणि बिली स्टेनलेक.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)