Tokyo Paralympics 2020: भारतीय बॅडमिंटनपटू Pramod Bhagat ने गाठली अंतिम फेरी, Silver Medal झाले निश्चित
बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पहिले पदक निश्चित झाले आहे. भारताचा स्टार पॅरा-शटलर प्रमोद भगतने (Pramod Bhagat) अंतिम फेरीच्या तिकिटासह देशासाठी रौप्य पदकाची खात्री केली आहे. पण जर त्यांनी अंतिम फेरी जिंकली, तर निश्चित झालेल्या रौप्य पदकाचा (Silver medal) रंग सुवर्णही होऊ शकतो.
नेमबाजी (Shooting) आणि अॅथलेटिक्स (Athletics) स्पर्धेनंतर आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics ) बॅडमिंटनमध्ये (Badminton) भारतीय खेळाडूंची (Indian players) कामगिरी दिसत आहे. बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पहिले पदक निश्चित झाले आहे. भारताचा स्टार पॅरा-शटलर प्रमोद भगतने (Pramod Bhagat) अंतिम फेरीच्या तिकिटासह देशासाठी रौप्य पदकाची खात्री केली आहे. पण जर त्यांनी अंतिम फेरी जिंकली, तर निश्चित झालेल्या रौप्य पदकाचा (Silver medal) रंग सुवर्णही होऊ शकतो. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रमोद भगतने उपांत्य फेरीत जपानच्या शटलरला हरवले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. त्याने जपानी शटलर फुजीहाराचा 21-11, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत प्रमोद भगत आपला जागतिक क्रमांक एकचा दर्जा आणि लोकांच्या अपेक्षा या दोन्हीवर टिकला.
दोन्ही सामन्यांच्या सुरुवातीला त्याला जपानी शटलरविरुद्ध संघर्ष करावा लागला पण नंतर त्याने सामन्याचा पूर्ण ताबा घेतला आणि जिंकला. प्रमोदने अंतिम फेरी गाठताच भारताचे 14 वे पदकही निश्चित झाले. भारतासाठी दुसर्या बॅडमिंटन कोर्टातून चांगली बातमी आली नाही कारण पॅरा शटलर मनोज सरकारची कामगिरी प्रमोद भगतसारखी मजबूत नव्हती. उपांत्य सामन्यात भारताच्या मनोज सरकारला ग्रेट ब्रिटनच्या शटलरच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.
मात्र उपांत्य फेरी गमावणे याचा अर्थ असा नाही की मनोज सरकारच्या पदक जिंकण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या. तो प्रमोद भगतसारखा सुवर्णपदक जिंकण्याच्या शर्यतीत नव्हता. मात्र आता त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळणार आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत आता प्रमोद भगतचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलशी होईल. ज्याने मनोज सरकारला पराभूत केले. कांस्य पदकाच्या सामन्यात मनोज सरकारची स्पर्धा प्रमोद भगत यांच्याकडून हरलेल्या जपानी शटलरशी होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी खेळण्यात येईल.
वयाच्या 5 व्या वर्षी पोलिओची लागण झाल्यानंतर डाव्या पायात दोष निर्माण झालेल्या भगत यांनी चार जागतिक अजिंक्यपद सुवर्णांसह एकूण 45 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्याने पुरुष एकेरीत दोन सुवर्ण आणि कांस्य जिंकले. याशिवाय गेल्या आठ वर्षांत बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण आणि पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)