IND vs NZ ICC Cricket World Cup 2019 Weather Report: जाणून घ्या आजच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान हवामानाचा अंदाज आणि आणि पिचची स्थिती

ईस्ट मिडलँड्समधील ट्रेंट ब्रिज, जेथे सामना सुरू होणार आहे तिथेही पाऊस पडू शकतो

Trent Bridge Weather And Pitch Report (Photo Credits: Getty Images)

दोनवेळा वर्ल्डकप (World Cup) विजेता भारत आज, 13 जून रोजी 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (ICC Cricket World Cup 2019) न्यूझीलंडशी (New Zealand) लढणार आहे.  हा सामना नॉटिंघम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) मैदानावर पार पडेल. तीन सामने खेळून, 6 गुणांसह न्यूझीलंड सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दोन सामने खेळत, 4 गुणांसह भारत चौथ्या स्थानावर आहे. दोन्हीही संघ तगडे असल्याने एकमेकांचे कडवे आव्हान दोघांच्याही समोर असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे दोन्ही देशांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र आजच्या सामन्याला पावसाची नजर लागली आहे. गेल्या दिवसांपासून नॉटिंघम येथे जोरदार पाऊस पडत आहे, आज पावसाची रिमझिम थोडी कमी झाल्याने सामना खेळला जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.

हवामान अंदाज - 

इंग्लंडच्या मेट ऑफिसने दक्षिण पूर्व इंग्लंड आणि ईस्ट मिडलँडच्या काही भागांत ‘येलो वॉर्निंग’ (Yellow Warning) जारी करत, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ईस्ट मिडलँड्समधील ट्रेंट ब्रिज, जेथे सामना सुरू होणार आहे तिथेही पाऊस पडू शकतो. सोमवार पासून या भागात सूर्याचे दर्शन झाले नाही. आज जरी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्ण सामना खेळला जाईल याबाबत शंका आहे. आज संपूर्ण दिवसभर तापमान 13-14 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे.

नॉटिंघम येथील हवामान -

पिच - 

अहवालानुसार, या मैदानावरील नवीन पिच हा अधिक मध्यभागी स्थित आहे. येथे आधी खेळल्या गेलेल्या तीन वर्डकप 2019 सामन्यांपैकी, प्रथम गोलंदाजी केलेले दोन संघ विजेते ठरले आहे. या मैदानावर आजचा सामना पार पडला तर, वेगवान गोलंदाजाला इथल्या पिचची मदत मिळेल.

भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रित बुमरा, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी (हेही वाचा: IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: या 5 खेळाडूं मधील Battle ठरेल मुख्य आकर्षण)

न्यूझीलंड संघ - मार्टिन गुपटिल, कॉलिन मुनरो, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लथम, जेम्स नेहेम, कॉलिन डी ग्रँडहोमे, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोलस, टीम साऊदी, ईश सोधी

दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा पराभव करत सध्या चोथे स्थान प्राप्त केले आहे. तर न्यूझीलंडने अफगाणीस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघाचा पराभव केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif