IND vs NZ 2nd ODI: भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडिया Playing XI मधून मोहम्मद शमी-कुलदीप यादव आऊट

न्यूझीलंडविरु द्धइडन पार्कवरील दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दाजच्या मॅचसाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहे. किवीकडून काइल जैमीसनने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या वनडेत 4 विकेटने झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ (Indian Team) आज ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्क मैदानावर दुसरा सामना खेळण्यास सज्ज होत आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी महत्वाचे आहे. यापूर्वी हॅमिल्टनमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यासाठी दोघांच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. यजमान किवी संघाकडून काइल जैमीसन (Kyle Jamieson) याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. जैमीसनला स्कॉट कुग्गेलैनच्या जागी स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, भारताने गोलंदाजीत दोन बदल करण्यात आले आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला विश्रांती देत नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) जागी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मालिका बरोबरी करण्याच्या आणि इडन पार्कवर विजयाची हॅटट्रिक करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात 347 धावा करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिल्यावर किवी संघाचे मनोबल उंचावले असेल. आणि आजच्या सामन्यात पहिल्या सारखा खेळ करत मालिका खिशात घालू पाहतील.

असा भारत ऑकलँडमध्ये भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी.

न्यूझीलंड: टॉम लाथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डि ग्रैंडहोम, जिमी नीशाम, हेनरी निकोल्स, हामिश बेनेट, ईश सोढी, टिम साऊथी, काइल जैमीसन, मार्क चैपमैन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now