All England Open Badminton Championships 2022: ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन भिडणार डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी, जाणून घ्या कधी आणि कुठे सामना पाहता येणार ?

त्याने उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

Shuttler Lakshya Sen

भारताचा युवा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन (lakshya sen) ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या (All England Open Badminton Championships ) अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी (Victor Axelsen) भिडणार आहे.  त्याने उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. लक्ष्यापूर्वी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत केवळ चार भारतीय खेळाडू पोहोचले असून केवळ दोन खेळाडूंना ही स्पर्धा जिंकता आली आहे.  1947 मध्ये प्रकाश नाथ, 1980 आणि 1981 मध्ये प्रकाश पदुकोण, 2001 मध्ये पुलेला गोपीचंद आणि 2015 मध्ये सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

प्रकाश पदुकोण 1980 मध्ये आणि पुलेला गोपीचंद 2001 मध्ये चॅम्पियन बनले. 20 वर्षीय लक्ष्यने अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरेल.  तब्बल 21 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटनची ही मोठी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत हा अंतिम सामना केव्हा, कुठे आणि कसा पाहावा लागेल. हेही वाचा Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जाहीर, भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार

हा सामना आज (20 मार्च) भारतीय वेळेनुसार 07.30 वाजता खेळवला जाईल. लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यातील हा मोठा सामना बर्मिंघम, यूके येथील युटिलिटी एरिना येथे खेळवला जाईल. हा सामना VH1, MTV आणि History TV18 चॅनलवर पाहता येईल. या शानदार सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट सिलेक्ट अॅपवर पाहता येईल.