ICC T20 World Cup Schedule 2021: आयसीसी टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, इथे पहा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
भारत 24 ऑक्टोबरला पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
ICC T20 World Cup Time Table 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी20 (T20) विश्वचषकाचे (Worldcup) वेळापत्रक (Schedule) जाहीर केले आहे. भारत 24 ऑक्टोबरला पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने आज टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक एका डिजिटल शोमध्ये जाहीर केले. त्याच वेळी तालिबानच्या ताब्यात आलेला अफगाणिस्तान 25 ऑक्टोबर रोजी शारजाहमध्ये या स्पर्धेचा पहिला सामना खेळेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंड आणि 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानशी सामना करेल. (हेही वाचा: ICC T20 Worldcup 2021: ICC T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणार 24 ऑक्टोंबरला)
गट 1 आणि गट 2 यासह एकूण आठ संघांनी आधीच सुपर 12 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता आठ संघ सुपर फेरीत स्थान मिळवण्यासाठी पहिल्या फेरीत पात्रता सामने खेळताना दिसतील. हे आठ संघ गट अ आणि गट ब मध्ये विभागले गेले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात ब गटातील पहिल्या पात्रता सामन्यासह स्पर्धेची सुरुवात होईल. त्याच गटाचा दुसरा सामना त्याच दिवशी स्कॉटलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल.
तर ग्रुप बी मध्ये, आयर्लंड-नेदरलँड्स आणि श्रीलंका-नामिबिया यांच्यातील सामने 18 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये खेळले जातील. उर्वरित आठ संघांसह दोन्ही गटांचे अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत सहभागी होतील. या स्पर्धेचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील.
टी20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. पहिल्या फेरीनंतर त्यात ग्रुप बी चा विजेता संघ आणि ग्रुप ए चा उपविजेता संघ असेल. दुसरीकडे वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा गट 1 मध्ये समावेश आहे. पहिल्या फेरीनंतर त्यात अ गटातील विजेत्या संघाचा आणि ब गटातील उपविजेता संघाचा समावेश असेल. सुपर 12 मधील दुसऱ्या फेरीचे सामने 23 ऑक्टोबरपासून खेळले जातील. पहिला सामना ग्रुप 1 मध्ये समाविष्ट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज एकाच दिवशी लढतील. डाऊनलोड करा आयसीसी वर्ल्डकपचे वेळापत्रक
17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक खेळला जाणार आहे. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला आणि दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. टी -20 विश्वचषकाचा शीर्षक सामना अर्थात अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तर अंतिम फेरीसाठी 15 नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. नियोजित सामने नियोजित वेळेप्रमाणे न झाल्यास दोन उपांत्य फेरीसाठी देखील राखीव दिवस असतील.