ICC T20 World Cup 2024 Winner and Runner-up Prize Money: T20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारताला मिळाले 'इतके' कोटी; पराभूत संघ दक्षिण आफ्रिकाही मालामाल

जवळपास 17 वर्षांनी भारताने T20 विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

Photo Credit - X

ICC T20 World Cup 2024 Winner and Runner-up Prize Money:  भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषकाच्या अंतिम सामना झाला. जवळपास 17 वर्षांनी भारताने T20 विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. एकूण 20 संघ विश्वचषकात सहभागी झाले होते. सर्वांना हरवून भारत आणि दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. यंदाचा T20 विश्वचषक हा अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. कारण, आतापर्यंत खेळलेल्या सर्व T20 विश्वचषकांच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम यावेळी ठेवण्यात आली होती. ICC नुसार, T20 विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीसाठी एकूण  $ 11.25 दशलक्ष खर्च करण्यात आली आहे. रुपयात बोललो तर ही रक्कम सुमारे 93.80 कोटी रुपये आहे.

T20 विश्वचषक विजेत्या संघाला किती मिळाले पैसे?

T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकणाऱ्या संघाला 2.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले. रुपयात ते सुमारे 20.42 कोटी आणि ट्रॉफी.

उपविजेत्याला संघाला किती पैसे मिळणार?

दुसरीकडे उपविजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. उपविजेत्या संघाला $1.28 दशलक्ष डॉलर म्हणजेच 10.67 कोटी रुपये मिळाले आहेत. विजेत्या संघाच्या तुलनेत ही रक्कम निम्मी आहे.

उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला 787,500 एवढी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सुपर 8 मध्ये बाहेर पडलेल्या संघांना 382,500 म्हणजेच 3.8 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, नवव्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 247,500 किंवा 2.6 कोटी रुपये दिले जातील. 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 225,000 किंवा 1.87 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल.

प्रत्येक विजयासाठी संघाला पैसे

बक्षीस रकमेव्यतिरिक्त, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर त्या संघाला बक्षीस म्हणून पैसे देखील मिळाले आहेत. आयसीसीनुसार, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर संघाला 31,154 डॉलर म्हणजेच 26 लाख रुपये मिळाले आहेत. त्यात उपांत्य किंवा अंतिम सामन्याचा समावेश नाही.