Hockey World Cup 2018: Indian Hockey Team साठी आजचा समाना महत्वपूर्ण, उपात्यंफेरीत मिळणार का प्रवेश?
तसेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 5-0 अशा फरकाने नमविले होते. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना अटीतटीचा असणार असून बेल्जियमविरुद्ध खेळविला जाणार आहे.
Hockey World Cup 2018: भारतीय हॉकी संघाने या विश्वचषक स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 5-0 अशा फरकाने नमविले होते. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना अटीतटीचा असणार असून बेल्जियमविरुद्ध खेळविला जाणार आहे.
भारतीय संघाने गेल्या 43 वर्षात पहिल्यांदा विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 5-0 अशा फरकाने हरविले आहे. मात्र आजचा सामना बेल्जियम (Belgium Team) विरुद्ध रंगणार असून आजवर भारतीय संघाने गेल्या पाच वर्षात 19 वेळा परस्परांविरुद्ध खेळी केली आहे.बेल्जियमवर विजय मिळवण्यासाठी खेळाडूंना सरस कामगिरी करावी लागणार आहे. आफ्रिकेविरुद्ध मनदीप सिंग, सिमरनजित सिंग, आकाशदीप आणि ललित उपाध्याय यांच्या आक्रमक खेळीने चोख कामगिरी बजावली.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू
मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलरक्षक), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिम्रनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलरक्षक)