Hardik Pandya's stepbrother arrested : हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक; 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

भागीदारीच्या व्यवसायातील पैसे गुपचूप खात्यात वळवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Hardik Pandya (Photo Credit: X)

Hardik Pandya's stepbrother arrested : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या(Hardik Pandya)च्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या( Krunal Pandya) यांची आर्थिक फसवणूक केल्या केल्याबद्दल सावत्र भाऊ वैभव पांड्या(Vaibhav Pandya) (37) याला अटक करण्यात आली आहे. वैभव पांड्या याने सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा :Mihir Diwakar Was Taken in Custody: एमएस धोनीचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकरला अटक; क्रिकेटपटूने दाखल केला होता फसवणुकीचा गुन्हा )

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, वैभव पांड्या याला बुधवारी रात्री उशीरा त्याच्या सावत्र भावांची व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याने मुंबईतील पार्टनरशिप फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांची हेराफेरी करत लाखो रूपये त्याच्या खात्यात वळते करूण घेतले होते. याची माहिती त्याने इतर दोघांना दिली नव्हती. यामुळे हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या यांचे नुकसान झाले, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

2021 मध्ये हार्दिक, कृणाल, आणि वैभव या तिघांनी मिळून भागिदारीत पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. भागीदारीच्या अटी अशा होत्या की हार्दिक आणि कृणाल प्रत्येकी 40% भांडवल देणार होते. तर सावत्र भाऊ वैभव 20 टक्के देऊन दैनंदिन कामकाज पाहणार होता. मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटला जाणार होता. मात्र, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला न कळवता वैभवने त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरु केली. या सगळ्यामध्ये, मूळ भागीदारीचा नफाही कमी झाला. ज्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच, वैभव पांड्या याने गुपचूपपणे त्याचा नफा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवला. ज्यामुळे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोघांचे नुकसान झाले. वैभवने पार्टनरशिप फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये घेतले आणि लाखो रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांत गेल्यास बदनामी करण्याची धमकीही वैभवने दोघांना दिली होती.