Hardik Pandya: हार्दिक पंड्याचं बडोद्यात जोरदार स्वागत; हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो (Watch Video)

अनंत राधीकाच्या लग्नानंतर त्याने बडोद्यात हजेरी लावली. तेथे क्रिकेट चाहत्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला.

Hardik Pandya: ऑलराऊंडर हार्दिक पंड्यावर सध्या चारही बाजूंनी प्रेमाचा वर्षाव होतोय. अनंत राधीकाच्या लग्नानंतर त्याने बडोद्यात हजेरी लावली. तेथे क्रिकेट चाहत्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. बडोद्यात दाखल होताच त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लोकल खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. दरम्यान बस रॅली सुरु असताना हार्दिक पंड्या चक दे इंडिया हे गाणं गाताना दिसून आला. वानखेडे स्टेडियमवर सत्कार सोहळ झाल्यानंतर खेळाडू आपआपल्या घरी परतले. मात्र हार्दिक पंड्या आपल्या घरी गेला नव्हता. त्याने राधिका- अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर तो आता आपल्या घरी परतला आहे. (हेही वाचा:युवराज सिंगसह WCL 2024 विजेत्या संघाच्या 'तौबा तौबा' व्हिडिओवर अपंगत्वाची चेष्टा केल्याच्या आरोपांवर हरभजन सिंगचे स्पष्टीकरण )

व्हिडीओ पहा