'लो जी देखो ये अंग्रेजी इनकी...' या शब्दात हरभजन सिंह याने उडवली वीना मलिकची खिल्ली

भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंह याने ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार वीना मलिक याची खल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी युनायटेड नेशन जनरअसेंबली केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंहने नाराजी दर्शवत एक ट्विट केले होते. हरभजन सिंह यांच्या ट्विटला वीना मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे

Harbhajan Singh And Veena Malik (Photo Credit: Facebook)

भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंह याने ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार वीना मलिक याची खल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी युनायटेड नेशन जनरअसेंबली केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंहने नाराजी दर्शवत एक ट्विट केले होते. हरभजन सिंह यांच्या ट्विटला वीना मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. सोमवारी इंम्रान खान यांचे समर्थन करत वीना मलिकने एक ट्विट केले होते. ज्यात तिने surely या शब्दाच्या जागी surly हा शब्द वापरला होता. यामुळे हरभजन सिंह याने अंग्रेजी भाषेवरून वीना मलिकची खिल्ली उडवली आहे.

युनायटेड नेशन जनरल असेंबली येथे इमराम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंह यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर हरभजन याने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. दरम्यान, हरभजन म्हणाला होता की, "युनायटेड नेशन जनरल असेंबली येथील भाषणात इम्रान खान यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती. यांच्या विधानाने दोन्ही देशात अधिकच तणाव निर्माण होईल. या दरम्यान ते शांतते संदर्भात विधान करतील असे अपेक्षा होती",असे हरभजन सिंह म्हणाला होता.

हरभजन सिंह याचे ट्विट-

यावर आपली प्रतिक्रिया देत वीना मलिकने एक ट्विट केले होते. यात तिने इंम्रान खान यांचे समर्थन करत म्हणाली की, "इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेबद्दल बोलले आहे. त्याने त्या भयानक दृश्याबद्दल सांगितले आहे जे कर्फ्यू हटवल्यानंतर नक्कीच दिसेल. त्यांना या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नाहीत, तुम्हाला इंग्रजी समजत नाही का?" असे वीना मलिक म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा- रोहितची उत्तुंग भरारी, तर अश्विनची टॉप १० मध्ये

वीना मलिकचे ट्वीट-

परंतु, हरभजन सिंह याच्या इंग्रजी भाषेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वीना मलिकची सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. या ट्विटमध्ये वीना मलिकने surely या शब्दाच्या जागी surly असा शब्द लिहला आहे. हे हरभजन सिंह याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वीना मलिक यांची फिरकी घेतली. यावर हरभजन सिंह म्हणाला की, "तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुमच्या surly या शब्दाचा नेमका अर्थ काय? लो जी देखो ये अंग्रेजी इनकी.. तसेच काही लिहण्याअगोदर आधी वाचत जा",असा सल्लाही त्याने वीना मलिकला दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now