Eid-ul-Fitr 2020: इरफान पठान सांगतोय लॉकडाऊन दरम्यान घरी नमाज पठण कसे कराल; पहा व्हिडिओ

त्यामुळे आनंदाचा हा सण घरच्या घरी साजरा करावा लागणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर इरफान पठान सांगतोय घरच्या घरी नमाज पठण कसे कराल, पहा व्हिडिओ...

Irfan Pathan (Photo Credits: Instagram)

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजान ईद (Ramadan Eid) हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र सध्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे  (Lockdown) ईदीच्या सणाला अत्यंत साधे रुप आले आहे. देशभरातील मशीदी बंद असून एकत्रितपणे नमाज पठण, सेलिब्रेशन करणे देखील शक्य होणार नाही. त्यामुळे आनंदाचा हा सण घरच्या घरी साजरा करावा लागणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर इरफान पठान (Irfan Pathan) याने  इंस्टाग्रावर व्हिडिओ शेअर करत घऱच्या घरी नमाज पठण कसे करावे याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्याने सर्वांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

रमजान ईदला 'ईद-उल्-फित्र' (Eid-al-Fitr) किंवा मीठी ईद (Meethi Eid) असेही म्हणतात. यंदा चंद्रदर्शनानंतर 24 किंवा 25 मे रोजी ईदचा सण साजरा केला जाण्याची शक्यता आहे. रमजानचा महिना पवित्र असून यात महिनाभर कडक उपवास म्हणजेच रोझे केले जातात. शव्वाल महिन्यातील चंद्रदर्शनाने रोझांची सांगता होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मशीदमध्ये जावून एकत्रित नमाज पठण केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंग पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे एकमेकांना भेटून 'ईद मुबारक' करता येणार नाही किंवा एकत्रित नमाज पठण करणेही शक्य होणार नाही. (‘एमएस धोनी ने रागात बॅट फेकली आणि...’ इरफान पठाण, गौतम गंभीर यांनी सांगितला संतापलेल्या 'कॅप्टन कूल'चा आठवणीतला किस्सा)

इरफान पठान व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

#prayer #stayhome #lockdown #coronavirus

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on

इरफान पठान याने क्रिकेट करिअरमध्ये भारतीय संघासाठी 29 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 54 इनिंग्स मध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेट व्यतिरिक्त 120 एकदिवसीय सामने खेळत 118 इंनिग्स मध्ये 173 विकेट्स घेण्यात त्याला यश आले आहे. त्याचबरोबर इरफान T20 चे 24 सामने खेळला असून 23 इंनिग्समध्ये त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच ऑलराऊंडर असलेल्या इरफानने टीमसाठी एकूण 4161 धावा केल्या आहेत.