Yuzvendra Chahal-Dhanashree Verma’s Haldi Pictures: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या हळद सेरेमनीचे फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल, पाहा हे खास Photos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फिरकी गोलंदाजाने त्यांच्या हल्दी सोहळ्याचे फोटोज शेअर केले आहेत आणि हे सुंदर फोटो आपल्याला देखील चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील. तितक्याच गोंडस कॅप्शनसह चहलने हे फोटोज शेअर केले आणि असे लिहिले की, “हे सर्व पिवळसर होते, आपली हळद.”

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची हळद सेरेमनी (Photo Credits: Instagram)

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma’s Haldi Pictures: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा काही दिवसांपूर्वी विवाहसोहळा पार पडला. आणि आता हे नवविवाहित जोडपं त्यांच्या लग्नातील सर्वोत्कृष्ट क्षण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फिरकी गोलंदाजाने त्यांच्या हल्दी सोहळ्याचे फोटोज शेअर केले आहेत आणि हे सुंदर फोटो आपल्याला देखील चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील. तितक्याच गोंडस कॅप्शनसह चहलने हे फोटोज शेअर केले आणि असे लिहिले की, “हे सर्व पिवळसर होते, आपली हळद.” कॅप्शनबरोबर त्याने #DhanaSaidYuz हा एक हॅशटॅग देखील वापरला जे दोघांचे नाव जोडून तयार केलेले आहे. स्नॅप्समध्ये, नवविवाहित जोडप्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहे आणि त्यांच्याही चेहऱ्यावर मोठे हास्य फुललेले दिसत आहे. या फोटोंमध्ये धनश्री वर्माने आपला लूक पूर्ण करण्यासाठी फुलांचे दागिने परिधान केले. (Yuzvendra Chahal याला रोहित शर्माने दिल्या लग्नाच्या हटके शुभेच्छा, म्हणाला- ‘तू तुझ्या गुगली तिला न टाकता राखून ठेव’)

या दोघांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत फोटो देखील शेअर केले पण सोशल मीडियावर शेअर केलेले बहुतेक क्षण हे कॅन्डीडच होते. काही तासांपूर्वी धनश्रीने दोघांच्या साखरपुढे फोटो शेअर केले ज्यात ही जोडी फार गोड दिसत होती. चहलने पिवळे शेरवानी तर धनश्रीने पिवळ्या रंगाच्या लेहंगा परिधान केला होता. या दोघांनी फोटो क्लिक करण्याची कोणतीही संधी सोडली नाही आणि प्रत्येक सोहळ्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. आणि आता आपण युझीने शेअर केलेल्या फोटोंवर एक नजर टाकूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

दरम्यान, आयपीएलसाठी युएईला रवाना होण्यापूर्वी चहल आणि कोरिओग्राफर असलेल्या धनश्री यांचा रोका सोहळा पार पडला होता. त्यानंतर चहल हा आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला होता जिथे काही दिवसांनंतर धनश्री देखील त्याचा उत्साह वाढवण्यासाठी पोहचली. आयपीएल संपुष्टात येताच चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला तिथे तो वनडे आणि टी-20 मालिका खेळला होता, पण मालिका संपवून मायदेशात परतल्यावर चहलने धनश्रीबरोबर लग्न केल्याच सर्वांनाच सरप्राईज दिलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif