Yuzvendra Chahal Birthday Special: हे आहेत 'चहल टीव्ही' च्या पडद्यामागचे अविस्मरणीय क्षण, पहा हा (Video)
बीसीसीआयने चहलला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 'चहल टीव्ही' चे काही सर्वोत्तम क्षण शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये 'चहल टीव्ही' च्या पडद्यामागचे काही क्षण दाखवण्यात आले आहे.
सध्या, भारतीय क्रिकेट संघाचा एक सर्वात महत्वाचा गोलंदाज म्हणून ओळख असलेला यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आजच्या दिवशी 1990 मध्ये हरियाणातील जिंद येथे चहल याचा जन्म झाला. आजच्या काळातील भारतीय क्रिकेटचा बॉलिंग मधील एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून चहल याची ओळख आहे. नुकतेच पार पडलेल्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये चहलने आपल्या प्रभावी खेळीने सर्वांच्या मनावर छाप सोडली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. चहल यांनी भारतासाठी 48 वनडे आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्यांनी आजवर 84 आणि टी-20 मध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे दोन सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी 6-6 विकेट घेतल्या आहेत. (IND vs WI: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी सुनील नारायण, केरन पोलार्ड यांची वेस्ट इंडिज संघात वर्णी)
चहल मैदानावरील आपल्या खेळीसह बीसीसीआय (BCCI) टीव्हीवरील 'चहल टीव्ही' (Chahal TV) द्वारे ही चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. जवळजवळ सर्व सामन्यानंतर चहलने भारतीय संघातल्या अनेक खेळाडूंच्या, प्रशिक्षकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. बीसीसीआयने चहलला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 'चहल टीव्ही' चे काही सर्वोत्तम क्षण शेअर केले आहे. हा विडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा @ yuzi_chahal23, आमच्या स्वत: च्या चाहल टीव्हीचे काही अविस्मरणीय क्षण". या व्हिडिओमध्ये 'चहल टीव्ही' च्या पडद्यामागचे काही क्षण दाखवण्यात आले आहे. दरम्यान, त्याचे टीम इंडियाचे मित्र- रोहित शर्मा, शिखर धवन यांनी देखील ट्विटरवर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी चहलची वनडे संघात निवड करण्यात आली आहे. चहलने इंग्लंडमध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावली होती. गेल्या काही महिन्यात चहलने वनडे आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपल्या खेळीत सातत्य ठेवून चहलने वन डे संघात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. चहलने प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध केलय.