'रासोडे में कौन था' रॅपवर युजवेंद्र चहल आणि मंगेतर धनश्री वर्माची मस्ती, तर क्रिस गेलं म्हणाला 'आता पुरे! मी रिपोर्ट करेन' (Watch Video)
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची होणारी पत्नी धनश्रीलाही याचा मोह आवरता आला नाही. चहल आणि धनश्रीने आपल्या मजेदार अंदाजात 'रसोडे मे कौन था',चं व्हर्जन नुकतंच रिलीज केलं.
Yuzvendra Chahal ‘Rasode Mein Kaun Tha’ Version: ‘रसोडे मे कौन था?’, असं विचारणाऱ्या 'कोकिलाबेन', 'गोपीबहू' आणि 'राशी' यांचा एक व्हिडिओ गेल्या बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत आहे. रॅप स्वरुपात सादर केल्या जाणाऱ्या या व्हिडिओचे अनेक व्हर्जन देखील सोशल मीडियावर सध्या चांगलंच गाजत आहे आणि टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनाही मोह आवरता आला नाही. सध्याच्या घडीला आयपीएलच्या (IPL) तयारीमध्ये व्यस्त असणाऱ्या चहलने लॉकडाऊन काळात कायमच सोशल मीडियाद्वारे क्रीडा चाहत्यांना आपल्या टिकटॉक व्हिडिओने थक्क केलं. चहलने पोस्ट केलेले व्हिडिओ आणि फोटो अनेक यूजर्सचे लक्ष वेधून घेतात. या सर्वांमध्ये आता चहल आणि त्याची मंगेतर धनश्रीच्या एका व्हिडिओने यूजर्सचे लक्ष वेधले आहे. चहल आणि धनश्रीने आपल्या मजेदार अंदाजात 'रसोडे मे कौन था',चं व्हर्जन नुकतंच रिलीज केलं. (Rasode Me kon Tha Kokilaben Video: रसोडे मे कौन था व्हिडिओ वर ओरिजनल कोकिलाबेन म्हणजेच रुपल पटेल यांंनी दिली 'ही' रिएक्शन)
आता आमची पाळी... धनश्री, तर सांग 'रसोडे मै कौन था', असं कॅप्शन देत चहलनं हा व्हिडिओ शेअर केला. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहल 'कोकिला बेन' बनला आहे, तर त्याची मंगेतर धनश्री 'गोपी बहु' च्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये चहलसोबत धनश्रीचे हावभावदेखील यूजर्सना पसंत पडत आहेत. चहल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. चहलचे टिकटॉक व्हिडिओ चांगलेच पसंत केले जायचे, टिकटॉकवर भारतात बंदी घातली असली तरी सोशल मीडियावर चहलची मस्ती सुरूच आहे.
चहलच्या व्हिडिओवर क्रिस गेलने देखील एक मजेदार कमेंट लिहली, "आता पुरे झाले, यासाठी मी तुमच्या इंस्टाग्राम पेजचा रिपोर्ट करेन."
आयपीएल दरम्यान खेळाडूंसोबत यंदा त्यांचे कुटुंब नसले तरी खेळाडू आपल्या पद्धतीने मजा करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या दरम्यान, चहलने सोशल मीडियावर धनश्रीसोबतचा व्हिडिओ शेअर केला. दोघांचा हा मजेदार अवतार सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे आणि लोकांकडून पसंती केला जात आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला चहलने धनश्रीसोबत रोका (साखरपुडा) केला. चहलने आपल्या रोका समारंभाचे फोटो शेअर करून आपलं नातं जाहीर केलं.