Global T-20 League: खराब 'पंचगिरी' मुळे युवराज सिंह बाद, ट्विटरवर यूजर्स ने व्यक्त केला संताप
पण 'सिक्सर किंग'ज्या प्रकारे युवराज आऊट झाला ते सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ग्लोबल टी-20 लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात युवराज पंचांच्या खराब निर्णयाचा बळी पडला.
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर युवराज साध्य कॅनडात होणाऱ्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळात आहे. ग्लोबल टी-20 लीग पहिल्याच सामन्यात युवराज सिंह आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आमने-सामने आले. युवराज टोरोंटो नॅशनल (Toronto Nationals) संघाचा कर्णधार आहे, तर गेल हा व्हँकोव्हर नाइट्स (Vancouver Knights) कडून खेळात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा युवराजचा पहिलाच सामना होता. सावरांना युवीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण 'सिक्सर किंग'ने सर्वांनाच निराश केले. एक सिक्स तर सोडा युवराजने साधा एक चौकार देखील मारला नाही. (योगराज सिंह यांचा एमएस धोनीवर 'यू टर्न', आता या गोष्टीसाठी करताहेत 'कॅप्टन कूल'चे कौतुक, पहा Video)
पण हे सर्व सोडून ज्या प्रकारे युवराज आऊट झाला ते सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ग्लोबल टी-20 लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात युवराज पंचांच्या खराब निर्णयाचा बळी पडला. ज्यामुळे युवी व्हॅनकूवर नाइट्स विरुद्ध 27 चेंडूत 14 धावाच करू शकला. आयपील आणि क्रिकेट विश्वचषकनंतर ग्लोबल टी-20 लीगमध्ये देखील खराब अम्पायरिंग बघायला मिळाली. ज्यामुळे युवराजसारख्या मोठ्या खेळाडूला आऊट नसतानाही माघारी परतावे लागले. 17व्या ओव्हरमध्ये युवराज व्हँकुव्हर नाइट्सचा जलद गोलंदाज रिजवान चीमा याच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चेंडू मिस केला आणि तो चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हसला लागून सरळ स्टम्पला लागतो. अशा वेळी युवराजचा पाय क्रीजच्या आतच होता आणि नंतर पाय बाहेर पडला. याच्यावर स्क्वेअर लेगवर उभे असलेलय ग्राउंड अंपायर लक्ष दिले नाही आणि युवराजला आऊट घोषित केले. युवराज देखील मैदान सोडून बाहेर जातो आणि नंतर रिप्लेमध्ये दिसते की तो आऊट नव्हता. याचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा चाहते देखील हैराण झाले. पहा हा व्हिडिओ:
तो नाबाद नव्हता तरीदेखील त्याला माघारी परतावे लागले कारण अंपायरने त्याला आऊट दिले होते
गंभीर पंचगिरीची चूक
युवराज टोरंटो संघाकडून खेळत आहे. त्याच्या संघात ब्रॅंडम मॅक्क्युलम, किरन पोलार्ड यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. भारताला 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराजने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला होता. मात्र त्याला जास्त सामने खेळण्यास मिळाले नाही.