Year Ender 2021: या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी शतके लागवण्यात इंग्लंड फलंदाज नंबर 1 तर भारताकडून ‘हा’ फलंदाज आघाडीवर; पहा टॉप-5 शतकवीर

2021 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. ही सर्व शतके त्याने कसोटी सामन्यात झळकावली असून या वर्षात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या टॉप-5  शतकवीरांच्या यादीत रूटसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

जो रूट (Photo Credit: PTI)

Year Ender 2021: इंग्लंडचा (England) कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) साठी सध्याचा ऑस्ट्रेलिया दौरा काही खास ठरला नसत असला तरी ब्रिटिश कर्णधाराने टेस्ट क्रिकेटमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून बॅटने भल्याभल्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. रूटच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने भारताविरुद्ध (India) मायदेशात आणि विदेश दौऱ्यावर तर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांच्या मालिकेत पराभव पत्करला असला तरी वैयक्तिक म्हणून रूटने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावी खेळी केली आहे. या वर्षी रूटने अनुभवी गोलंदाजांविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आणि आपला दबदबा निर्माण केला. त्याच्या नेतृत्व क्षमतेवर सध्या प्रशचिन्ह उपस्थित केले जात असताना एक फलंदाज म्हणून त्याच्या कौशल्यावर कोणतीही शंका नाही. रूटने 2021 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 6 कसोटी शतके झळकावली आहेत. या वर्षी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या टॉप-5 शतकांमध्ये रूटसोबतच खालील खेळाडूंचा समावेश आहे. (Year Ender 2021: भारताचे ‘हे’ पाच युवा स्टार खेळाडू ठोठावताहेत टीम इंडियाचे दार, 2022 मध्ये करू शकतात आंतरराष्ट्रीय पदार्पण)

जो रूट

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने या वर्षात 14 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले असून त्याने 62.69 च्या सरासरीने 1630 धावा केल्या आहेत. या वर्षात रूटच्या नावावर 6 शतके आहेत. अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा आणि वर्षाच्या अखेरीस खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याला ही संख्या आणखी वाढवण्याची संधी असेल.

दिमुथ करुणारत्ने

श्रीलंकेच्या करुणारत्नेने कसोटी क्रिकेटमध्ये यावर्षी 4 शतके झळकावले आहेत. त्याने 7 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 69.38 च्या सरासरीने एकूण 902 धावा केल्या आहेत.

फवाद आलम

पाकिस्तानच्या या स्टार फलंदाजाने यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 शतके झळकावून टॉप-5 मध्ये आपले नाव नोंदवले आहे. फवादने यावर्षी 42.23 च्या सरासरीने 571 कसोटी धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे तर कसोटी क्रिकेट यंदा टीम इंडियासाठी काही खास ठरले नाही. त्यांनी नवनियुक्त कसोटी उपकर्णधार ‘हिटमॅन’ संघाकडून दोन कसोटी शतके करणारा एकमात्र खेळाडू आहे. रोहितने यावर्षी 11 कसोटी सामन्यात 47.68 च्या सरासरीने 906 धावा केल्या आहेत. तसेच शर्मा या वर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणारा जो रूटनंतर दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

रिषभ पंत, आर अश्विन आणि केएल राहुल

भारताचे हे स्टार खेळाडू देखील या यादीत आहेत. टीम इंडियाच्या या त्रिकुटाने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक शतक लगावले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या वर्षअखेरीस हे तिघे बॉक्सिंग डे कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे या तिघांकडे दोन डावात रोहितची बरोबरी किंवा त्याला पछाडण्याची संधी असेल.