Year Ender 2019: पेसर्सच्या 'पंच' ने टीम इंडियाला बनवले मजबूत संघ, 'या' गोलंदाजाची राहिली महत्वाची भूमिका
भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 हे वर्ष एक उत्कृष्ट सिद्ध झाले. टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात जास्त श्रेय त्यांच्या गोलंदाजांना जाते. गेल्या पाच वर्षात गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याने आज भारतीय क्रिकेटने हे यश संपादन केले आहे. संघाच्या विजयात बुमराहचे महत्वाचे योगदान आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 हे वर्ष एक उत्कृष्ट सिद्ध झाले. निश्चित, सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने राहिले नाही, परंतु भारतीय संघाने 2019 टेस्ट क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले. या संघाने घरच्या मैदानावर खेळताना सलग चार डावाने रेकॉर्ड विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Team) कामगिरीमध्ये दिसणारी सुसंगतता कोणत्याही क्रीडा संघाचे स्वप्न असू शकते. यावर्षी भारताच्या विजयाची सरासरी 87.5 होती, शिवाय त्यांनी एकही टेस्ट सामना गमावला नाही. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे, ज्यांनी 66.6 च्या सरासरीने यंदा सामने जिंकले. आणि टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात जास्त श्रेय त्यांच्या गोलंदाजांना जाते. गेल्या पाच वर्षात गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याने आज भारतीय क्रिकेटने हे यश संपादन केले आहे. यावर्षी कसोटी संघाच्या चारित्र्यात प्रगती पाहायला मिळाली. याची सुरुवात विराट कोहली याने कसोटी संघाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर झाली.
भारताकडे नेहमीच जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज राहिले आहेत. भारतीय संघात यंदा झालेला एक बदल म्हणजे यॉर्कर बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचा समावेश. जानेवारी 2018 पासून - जेव्हा बुमराहने पदार्पण केले - तेव्हापासून भारतीय वेगवान गोलंदाजांनी 22 टेस्ट मध्ये 20.74 च्या सरासरीने 274 विकेट्स घेतल्या आहे. कोणत्याही संघातील या सर्वात जास्त विकेट्स आहेत. संघाच्या विजयात बुमराहचे महत्वाचे योगदान आहे. त्याने टी-20 मध्ये 42 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये देखील त्याची सर्वोत्तम सरासरी 21.88 आहे आणि इकॉनॉमी 4.49 त्याच्या डेब्यूनंतर चांगली राहिली आहे. दशकाच्या शेवटी बुमराहने भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. तो वेगळा आहे, त्याच्याकडे विविधता आहे आणि वेळेआधी विचार करणारा क्रिकेटर आहे. दुसरा वेगवान गोलंदाज म्हणजे- मोहम्मद शमी (Mohammed Shami) , जो दोन फॉर्मेटमध्ये (टेस्ट आणि टी-20) 2019 मध्ये भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमीने विश्वचषकमध्ये हॅटट्रिक घेतली. कोहलीच्या नेतृत्वात शमीची बरीच वाढ झाली आहे. त्याने 37 कसोटींमध्ये 137 गडी बाद केले. शमीने परदेशातही चांगली कामगिरी केली असून 25.87 च्या स्ट्राइक रेटने त्याने 86 विकेट्स घेतल्या आहेत.
इशांत शर्मा (Ishant Sharma) याने आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग केला. त्याला संघातील आपली भूमिका अधिक चांगली समजली आहे. इशांतप्रमाणेच उमेश यादव (Umesh Yadav) यानेही त्याची लांबी आणि वेगावर खूप काम केले आहे. बुमराहला दुखापत झाल्यावर इशांत, शमी आणि उमेशने वेगवान गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. या पेसर्सने भारतीय संघाला अजून मजबूत केले आणि जवळपास फलंदाजांकडून लक्ष आपल्याकडे खेचून आणले आहे. याचा पुरावा म्हणजे, 2019 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी 59 बळी घेतले तर फिरकी गोलंदाजांना 37 विकेट्स मिळाले.
फलंदाजीत विराट रोहित शर्मा यांनी आपले वर्चस्व गाजवले आणि सर्वांचे मनोरंजन केले. विराट दशकातील सर्वाधिक धावा करणारा, तर रोहित 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. मयंक अग्रवाल यानेही चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिले टेस्ट शतक जडले, तर बांग्लादेशविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)