IPL Auction 2025 Live

Yashasvi Jaiswal Wins Player of the Match: यशस्वी जैस्वाल ठरला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी; भारताने बांगलादेश विरुद्ध 2-0 ने जिंकली मालिका

जैस्वालने भारत विरुद्ध बांगलादेश 2 ऱ्या कसोटी मध्ये एकापाठोपाठ दोन अर्धशतके झळकावली. भारताने बांगलादेशचा 2-0 असा व्हाईटवॉश केला.

Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

भारत विरुद्ध बांगलादेश 2 ऱ्या कसोटीमध्ये यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर पुरस्कार जिंकला. यशस्वी जयस्वालने 2 दोन कसोटी सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. ज्यामुळे फास्टेस फिफ्टीचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला गेला. ज्यामुळे त्याला सामनावीर ठरवण्यात आले. भारताने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. ज्यामुळे बांगलादेशचा 2-0 असा व्हाईटवॉश झाला. त्यामुळे भारतीय क्रीकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेना असे काही झाले आहे.

यशस्वी जैस्वालने सामनावीर पुरस्कार जिंकला

बांगलादेशचा 2-0 ने उडवला धुव्वा 

कानपूरमध्ये टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकून बांगलादेशचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला. अशा प्रकारे भारताने घरच्या मैदानावर नवा इतिहास लिहिला आहे. भारताने पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करून मायदेशात मोठी कामगिरी केली. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग 18 वा मालिका विजय आहे.

कानपूर कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. यादरम्यान बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 107 धावा केल्या. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, मात्र चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला 233 धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने चौथ्या दिवशी डावाची आक्रमक सुरुवात केली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 50,100 आणि 200 धावा करण्याचा पराक्रम केला. भारताने पहिला डाव 285/9धावांवर घोषित केला.