MI-W Vs UPW-W WPL 2023: मुंबई इंडियन्सचा यूपी वॉरिअर्सवर 72 धावांनी दणदणीत विजय, मुंबईचा फायनलमध्ये प्रवेश

मुंबईकडून नॅटली सिव्हर-ब्रंटने 38 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली.

WPL 2023 (Image Credit -Mumbai Indian Twitter )

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इस्सी वोंगच्या (Issy Wong) हॅटट्रिकच्या जोरावर यूपी वॉरिअर्सवर (UP Warriors)  72 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे महिला प्रीमिअर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे. डब्ल्यूपीएल (WPL 2023) स्पर्धेत इस्सी वोंग ही हॅटट्रिक घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. आता अंतिम लढतीत मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी असेल. हा सामना 26 मार्च रोजी म्हणजेच उद्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 182 धावा केल्या. मुंबईकडून नॅटली सिव्हर-ब्रंटने 38 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश ठरली, तिला 15 चेंडूत 14 धावा करता आल्या. मेली केरन 19 चेंडूत 29 धावा करत नॅटली सिव्हर-ब्रंटला चांगली साथ दिली ती बाद झाल्यावर खेळपट्टीवर आलेल्या पुजा वशिष्ठकरने केवळ 4 चेंडूत 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 11 धावांची खेळी केली.

183 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या युपी वॉरीयरची सुरुवात ही काही चांगली झाली नाही. यूपीकडून किरण नवगिरे एकाकी लढली. 27 चेंडूत 43 धावा करून ती बाद झाली. तिला दुसऱ्या बाजूनेही साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा 16, ग्रेस हॅरिस 14 आणि कर्णधार अ‍ॅलिसा हिली 11 धावा करून बाद झाल्या. मुंबईकडून इस्सी वोंगने हॅटट्रिक घेत युपीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.