SA vs AUS WTC Final 2025 Live Streaming In India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना; उद्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2025 मध्ये, दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी केली आणि पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
South Africa National Cricket Team vs Australia National Cricket Team, WTC Final 2025 Live Streaming: वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2025 चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 11 ते 15 जून दरम्यान खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जाईल. दोन्ही संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या (WTC) अंतिम सामन्यासाठी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करणार आहेत. दोन्ही संघांमध्ये अनेक उत्तम खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
क्रिकेट चाहते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ मजबूत गोलंदाजी आक्रमणासह मैदानात उतरतील, जे इंग्लंडच्या हवामान परिस्थितीत खूप प्रभावी ठरू शकते. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलंडसारखे अनुभवी आणि वेगवान गोलंदाज आहेत. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या संघात कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि डॅन पॅटरसनसारखे घातक गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत, एक कठीण स्पर्धा पाहायला मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीत, त्यांनी सलग सात सामने जिंकून 69.44% गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. अंतिम सामन्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम तयारी मजबूत करण्यासाठी अरुंडेलमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सराव खेळत आहे.
या चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी होती. त्यांनी पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंकेचा पराभव केला. तर भारताविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही अंतिम फेरीत प्रवेश केला.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 11 जूनपासून खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना किती वाजता खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी होईल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तुम्ही टीव्ही आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर कुठे पाहू शकता?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. याशिवाय, अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ-हॉटस्टारवर केले जाईल.
दक्षिण आफ्रिका: एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, टोनी डी जोरजी, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेझलवुड.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 03:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

