Women's T20 Challenge: हरमनप्रीत कौरचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, पाहा Playing XI

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केलेले आहेत. मागील दोन हंगामातील चॅम्पियन सुपरनोव्हाससाठी स्पर्धेत कायम राहण्याची ही शेवटची संधी आहे.

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना (Photo Credit: Instagram)

Women's T20 Challenge: महिला टी 20 चॅलेंजच्या तिसर्‍या हंगामातील तिसरा सामना ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि सुपरनोव्हाज (Supernovas) यांच्यात खेळला जाईल. आजच्या सामन्यातून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात सुपरनोव्हास कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झालेले नाहीत. मागील दोन हंगामातील चॅम्पियन सुपरनोव्हाससाठी स्पर्धेत कायम राहण्याची ही शेवटची संधी आहे. पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासला वेलॉसिटी संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत फायनल गाठण्यासाठी त्यांना आजच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. (Women's T20 Challenge, Live Streaming: ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

मंधानाच्या ट्रेलब्लेझरचे फायनलमधील स्थान जवळपास निश्चित आहे, पण त्यांना फक्त मोठा पराभव टाळणे आवश्यक आहे. ट्रेलब्लेझर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार स्मृतीवर असेल. वेलॉसिटीविरुद्ध मागील सामन्यात मंधाना केवळ 6 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर डॉटिन आणि रिचा घोष यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे, आजच्या सामन्यात तरी स्मृती ठसा उमटवू पाहत असेल. सोफी इक्लेस्टोन आणि आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांच्यावर आक्रमक गोलंदाजीची जबाबदारी असेल. दुसरीकडे, सुपरनोव्हासमध्ये कर्णधार हरमनप्रीत आणि श्रीलंका टी20 क्रिकेट संघाची कर्णधार अटापट्टूवर संघाला मोठ्या धावसंख्येवर नेण्याची जबाबदारी असेल. प्रिया पुनियावरही धावा काढण्याची जबाबदारी असेल.आयबॉन्गा खाकावर गोलंदाजांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. खाकाने वेलॉसिटी विरुद्धच्या मागील सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या.

पाहा ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हासचा प्लेइंग इलेव्हन

ट्रेलब्लेझर: स्मृती मंधाना (कॅप्टन), डिएंड्रा डॉटिन, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, दयालन हेमलथा, हर्लीन देओल, नट्टकन चंटम, सलमा खातून, राजेश्वरी गायकवाड, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड आणि झुलन गोस्वामी.

सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, जेमीमाह रॉड्रिग्स, शशिकला सिरीवर्डीन, अनुजा पाटील, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शकेरा सेलमन, पूनम यादव आणि आयबोंगा खाका.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Bangladesh Beat West Indies 1st T20 2024 Scorecard: बांगलादेशने पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा 7 धावांनी केला पराभव, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी; महेदी हसनने घेतले 4 बळी घेतले

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके