TBL vs SNO, Women's T20 Challenge, Live Streaming: ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
स्मृती मंधानाची ट्रेलब्लेझर आणि हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा सामना रंगणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आजचा जाईल. सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
TBL vs SNO, WT20 Challenge Live Streaming: स्मृती मंधानाची ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास (Supernovas) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा सामना रंगणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) आजचा जाईल. ट्रेलब्लेझर स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शानदार मिताली राजच्या वेलॉसिटीविरुद्ध विजयाने सुरुवात केली, तर सुपरनोव्हासला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ट्रेलब्लेझर आजच्या सामन्यातून आपली विजय लय कायम ठेवू पाहत असतील, तर सुपरनोव्हासला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील आजच्या महिला टी-20 चॅलेंज सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सामना संध्याकाळी 7:00 वाजता टॉस होणार तर सामना अर्धातास नंतर म्हणजेच 7:30 वाजल्यापासून सुरु होईल. (Women's T20 Challenge 2020: डिएंड्रा डॉटिनच्या नाबाद खेळीने ट्रेलब्लेझरची विजयी सुरुवात, मिताली राजच्या वेलॉसिटीवर 9 विकेटने केली मात)
दरम्यान ट्रेलब्लेझरने आजच्या सामन्यात विजय मिळवण्यास संघ थेट फायनलमध्ये पोहचेल, तर हरमनप्रीतचा संघावर स्पर्धेतून बाहेर पाडण्याचे संकट आहे. सुपरनोव्हासने आजवर दोनदा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे आणि त्यांना हॅटट्रिक करण्यासाठी आजच्या मोठा विजय मिळवणे गरजेचे आहे. सुपरनोव्हासचा नेट रनरेट वेलॉसिटीच्या तुलनेत पॉसिटीव्ह असल्याने त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवून फायनल गाठण्याची संधी आहे.
पाहा ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास संघ
ट्रेलब्लेझर: स्मृति मंधाना (कॅप्टन), पुनम राऊत, डिएंड्रा डॉटिन, दयालन हेमलता, दीप्ति शर्मा, सलमा खातुन, नुजत परवीन (विकेटकीपर), नट्टकन चंटम, राजेश्वरी गायकवाड, सोफी एक्लस्टोन, झूलन गोस्वामी, हर्लीन देओल, रिचा घोष, काश्वी गौतम, सिमरन बहादुर.
सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्ज, चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्डेन, पूनम यादव, शकेरा सेलमन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2020 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

