Women’s IPL 2020: युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान महिला चॅलेंजर स्पर्धा होण्याची शक्यता

तसेच क्रिडाविश्वावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Women's IPL Will be Held Be Held in UAE This Year (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संपूर्ण जगाला चांगलाच फटका बसला आहे. तसेच क्रिडाविश्वावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. याच दरम्यान, महिला आयपीएल किंवा महिला चॅलेंजर स्पर्धा (Women’s T20 Challenge) होण्याची शक्यता आहे, असे भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले आहेत. तसेच आयपीएलच्या अंतिम टप्प्यात महिला चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशीही माहिती समोर आली आहे.

नुकतीच आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सौरव गांगुली म्हणाले आहेत की, महिलांची आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रीय संघासाठीही आमच्याकडे योजना आहे, याची मी पुष्टी करतो. तसेच केंद्रीय करारानुसार महिला खेळाडूंसाठी एक शिबिर असेल जे देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे विलंबित झाले आहे. आम्ही आमच्या कोणत्याच क्रिकेटपटूला धोक्यात टाकू शकत नाही. मग ते महिला क्रिकेटपटू असो किंवा पुरुष क्रिकेटपटू. हे धोकादायक ठरू शकते. कोविड-19 मुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीही बंदच राहील. परंतु आमच्याकडे योजना आहे आणि महिलांसाठी एक शिबिर असेल, असे सौरव गांगुली म्हणाले आहेत. हे देखील वाचा- IPL 2020 SOP Update: ड्रेसिंग रूममध्ये फक्त 15 खेळाडू, रिक्त स्टेडियम! इंडियन प्रीमिअर लीग 13 मध्ये अशाप्रकारे होणार सोशल डिस्टंसिंगचे पालन

एएनआयटे ट्वीट- 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यासाठी गांगुली कूलिंग ऑफ पिरियडबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. गांगुली याबाबत तपशीलवार खुलासा केला नाही. महिला चॅलेंजर मालिका 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी तेथे एका शिबिराचे आयोजन केले असेल, अशी माहिती समोर आली आहे.



संबंधित बातम्या