जसप्रीत बुमराह याच्या फिटनेस टेस्टसाठी NCA ने नकार दिल्याने सौरव गांगुली करणार राहुल द्रविड शी चर्चा, जाणून घेणार पूर्ण प्रकरण
बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेस टेस्ट करण्यास नकार का दिला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू असे शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले. कोलकातामध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाले.
बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या फिटनेस टेस्ट करण्यास नकार का दिला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू असे शुक्रवारी बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले. कोलकातामध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाले की, "खरे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन. प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी एनसीए (NCA) हा पहिला आणि शेवटचा पर्याय असावा." बुमराहला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील एका मॅचदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो आता दुखापतीतून सावरत आहे. शिवाय, वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम वनडे सामन्याच्याआधी बुमराह टीम इंडियासह नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. आयसीसीच्या वनडेरँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेला 26 वर्षीय बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर मुंबईत आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक रजनीकांत शिवज्ञानम याच्याबरोबर प्रशिक्षण घेत आहे. (जसप्रीत बुमराह याच्यावर राहुल द्रविड नाराज? NCA मध्ये टेस्ट घेण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण)
बुमराहच्या प्रकरणावर भाष्य करताना गांगुली म्हणाले, “मी नुकतेच दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. या संदर्भात मी राहुल द्रविडशी बोलणार आहे. मी त्याला काही वेळाच भेटलो आहे. आम्ही ही समस्या समजतो आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करू." यानंतर गांगुली म्हणाला की, "बाहेरून दिसते आहे की ही बाब काही वेगळीचा आहे. बुमराह एनसीएमध्ये गेले तेव्हा मी कार्यरत नव्हतो. काय झाले? तुम्ही मला विचारल्यास एनसीए हा भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी शेवटचा पर्याय आहे. सर्व काही एनसीएमधून जायलाच हवे आणि म्हणूनच मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे."
अनेक कारणांमुळे बुमराह एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट घेऊ शकले नाहीत, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. बुमराहने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की तो पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये जाण्यास तयार नाहीत. यानंतर एनसीएने बुमराहची फिटनेस टेस्ट घेण्यास नकार दिला. बुमराहने पुनर्वसन दरम्यान वैयक्तिक फिटनेस तज्ञाची मदत घेतल्यामुळे एनसीएने त्याच्या फिटनेस टेस्टसाठी नकार दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)