WI W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल? जाणून घ्या

2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा आठवा सामना आज, 6 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.

WI W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल? जाणून घ्या
Photo: @windieswomen/@CricketScotland

WI W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 8 वा सामना वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाची सुरुवात काही खास झाली नव्हती. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत वेस्ट इंडिज संघाला नवशिक्या स्कॉटलंडविरुद्ध स्पर्धेत पहिला विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे स्कॉटलंडला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत वेस्ट इंडिजचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविण्याकडे स्कॉटलंडचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा:India Women vs Pakistan Women, 7th Match Live Streaming: टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध आज 'करो या मरो'चा सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग )

बांगलादेश महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यात 2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषकातील आठवा सामना कधी खेळला जाईल?

2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा आठवा सामना रविवार, 6 ऑक्टोबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता वेस्ट इंडिज महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यात खेळवला जाईल.

थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा

आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. अशा परिस्थितीत चाहते टीव्हीवर वेस्ट इंडिज महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडिज संघ: हेली मॅथ्यू (कर्णधार), कियाना जोसेफ, स्टॅफनी टेलर, डिआंड्रा डॉटिन, शर्मन कॅम्पबेल, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, जाडा जेम्स, एफी फ्लेचर, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक, शामिलिया कोनेल.

स्कॉटलंड संघ: सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस, कॅथरीन ब्राइस, अलिसा लिस्टर, प्रियनाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, अबताहा मकसूद, रॅचेल स्लेटर, ऑलिव्हिया बेल.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).