Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक जिंकणारा संकेत सरगर आहे तरी कोण? घ्या जाणून
संकेतच्या नावावर 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम (एकूण 256 किलो) आहे.
कॉमनवेल्थ 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारताचे पदक खाते उघडले आहे. संकेत महादेव सरगरने (Sanket Mahadev Sargar) 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 किलो वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलून पदक जिंकले. महाराष्ट्राच्या सांगलीच्या जिल्हाऱ्याचा असलेल्या संकेतला वेटलिफ्टिंगची प्रचंड ओढ आहे. संकेत (21) हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही तो चॅम्पियन होता. संकेतच्या नावावर 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम (एकूण 256 किलो) आहे.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे आहे
संकेतच्या वडिलांचे सांगलीत पानाचं दुकान आहे. त्याला आता आपल्या वडिलांना या कामातून आरान द्यायचा आहे. संकेत नुकताच म्हणाला, 'मी सुवर्ण जिंकले तर मी माझ्या वडिलांना मदत करेन. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आता त्यांना आनंद द्यायचा आहे. संकेतचे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.
Tweet
कॉमनवेल्थ स्पर्धेत सर्वात तरुण भारतीय वेटलिफ्टर्स
संकेतने गतवर्षी पटियाला येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नवा विक्रम नोंदवला. यासह संकेत महादेव सागरने ताश्कंद येथे झालेल्या 2021 कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 55 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले होते. याद्वारे सरगरने 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली. पोडियमवर अव्वल स्थान मिळवण्याबरोबरच संकेत महादेवने 113 किलो वजन उचलून स्नॅचमध्येही राष्ट्रीय विक्रम केला. संकेत हा कॉमनवेल्थ 2022 मध्ये सहभागी झालेल्या सर्वात तरुण भारतीय वेटलिफ्टर्सपैकी एक आहे. (हे देखील वाचा: Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक, गुरुराजा पुजारीने जिंकले कांस्यपदक)
गेल्या वेळी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सतीश शिवलिंगम आणि आर व्यंकट राहुल यांनी सुवर्णपदक जिंकले होते. संकेतलाही पदकाची आशा होती, मात्र दुखापतीमुळे तो शेवटच्या फेरीत योग्यरित्या वजन उचलू शकला नाही. 1950 मध्ये या खेळांमध्ये वेटलिफ्टिंगचा प्रथम समावेश करण्यात आला. भारताला आता या खेळात पदकांची खूप अपेक्षा आहे.