Virender Sehwag याचे शतक होऊ नये यासाठी 'या' क्रिकेटरने आपले करिअरच लावले पणाला, जाणून घ्या कोण होता 'तो'

भारताचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) जोवर खेळपट्टीवर असतो तोवर गोलंदाजांवर भारी पडायचा. सेहवागने आपल्या वनडे करिअरमध्ये 136 षटकार लगावले तर 15 शतकं केली आहेत. पण असा एक सामना होता ज्यात त्याने 99 धावांवर असताना षटकार ठोकला, पण त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही.

वीरेंद्र सेहवाग (Photo Credits: Twitter @virendersehwag)

क्रिकेटमध्ये 99 धावांवर आऊट होते पुरेसे वेदनादायक असते परंतु त्या स्कोअरवर अडकून राहणे फलंदाजासाठी आणखी त्रासदायक असते. आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत जे 99 धावांवर आऊट झाले किंवा नाबाद होऊन परतले. भारताचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) जोवर खेळपट्टीवर असतो तोवर गोलंदाजांवर भारी पडायचा. सेहवागने आपल्या वनडे करिअरमध्ये 136 षटकार लगावले तर 15 शतकं केली आहेत. पण असा एक सामना होता ज्यात त्याने 99 धावांवर असताना षटकार ठोकला, पण त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. आज आपण त्याच जुन्या सामन्याच्या आठवणी जागवणारी आहोत. दांबुलाच्या मैदानावर श्रीलंका (Sri Lanka) आणि भारतीय संघात (Indian Team) तिरंगी मालिकेअंतर्गत वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकाने पहिले फलंदाजी करून अवघ्या 170 धावा केल्या. भारताने 34 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 166 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी संघाला 5 धावांची गरज होती.

सूरज रणदीवच्या (Suraj Randiv) ओव्हरचा पहिला चेंडू सेहवागच्या बॅटला लागून विकेटकीपरकडे गेला, पण तो बॉल पकडू शकला नाही. यावर भारताला चार धावा मिळाल्या आणि आता भारताला विजयासाठी 1 धाव हवी होती तर सेहवाग 99 धावावर फलंदाजी करत होता. सेहवाग पुढील दोन चेंडूंवर धावा करू शकला नाही. रणदीवच्या चौथ्या चेंडूवर सेहवागने क्रीजच्या बाहेर येत षटकार मारला, पण अंपायरने नो-बॉल दिला. अशा स्थितीत भारताने सामना जिंकला, पण सेहवाग 99 धावांवर नाबाद परतला. यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली. रणदीवला त्याची चूक समजली पण त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. सल्ला देणाऱ्या तिलकरत्ने दिलशानला दंड ठोठावण्यात आला तर सेहवागने कबूल केले की श्रीलंकन टीमने कठोर प्रयत्न केले. कुमार संगकारा मुख्य आर्किटेक्ट असावा अशी चर्चाही रंगली होती, पण ते कधीच सिद्ध झाले नाही.

सेहवागने 251 वनडे सामन्यात 15 शतक आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने 8,273 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक दुहेरी शतकासह 219 धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दोनदा तिहेरी शतक करत 8586 धावा केल्या आहेत. सेहवागने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now