'व्हॉट अ कॅच'! तहलिया मॅकग्राने पकडला अफलातून कॅच पकडत दिले टीम वर्कचे उदाहरण, पाहा जबरदस्त Video
क्रिकेटमध्ये आपण आजवर अनेक अफलातून झेल पहिले असतीलच पण आज आम्ही तुम्हाला एक झेल दाखवणार आहोत जो तुम्ही कदाचितच पाहिला असेल. या झेलची खास गोष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट झेल पकडणारी खेळाडू ही एक महिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगमध्येही तहलिया मॅकग्राने एक भन्नाट झेल घेतला. अॅडिलेड स्ट्रायकर्सच्या मॅकग्रा आणि मॅडी पेन्ना यांनी हा एकत्रित घेतलेला झेल घेतला.
काळानुसार क्रिकेटची क्रेझ वाढत आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत फलंदाजी महत्वाची भूमिका बजावते. तसे, क्रिकेटमध्ये 'Catches Win Matches' अशी म्हण आहे कारण आपण स्कोअर बोर्डावर कितीही मोठी धावसंख्या उभारली असली तरी, आपल्याकडून एखादा झेल सुटला तर आपण सामनाही गमावला. आयपीएलसह अन्य टी-20 लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण आजवर अनेक अफलातून झेल पहिले असतीलच पण आज आम्ही तुम्हाला एक झेल दाखवणार आहोत जो तुम्ही कदाचितच पाहिला असेल. या झेलची खास गोष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट झेल पकडणारी खेळाडू ही एक महिला आहे. तहलिया मॅकग्रा असे या महिला खेळाडूचे नाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगमध्येही मॅकग्राने एक भन्नाट झेल घेतला. अॅडिलेड स्ट्रायकर्सच्या मॅकग्रा आणि मॅडी पेन्ना यांनी हा एकत्रित घेतलेला झेल घेतला. (IND vs AUS 1st Test: रिकी पॉन्टिंग गुरुजी बोलले आणि काही मिनिटांतच Prithvi Shaw क्लीन बोल्ड होऊन माघारी, पाहून व्हाल चकित Watch Video)
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर मॅकग्राद्वारे पकडलेल्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जात असताना फिल्डिंग करणाऱ्या पेन्नाने झेल घेण्यासाठी हात उंचावले पण चेंडू हाताला लागून अलगद उंच उडाला आणि त्याचा वेग काहीसा मंदावला. पेन्नाच्या हाताला लागून चेंडू थोडा मागे पडणार इतक्यात जवळच उभ्या असलेल्या तहलियाने चेंडूवर स्वतःला झोकून देत टप्पा पडण्यापूर्वीच यशस्वीरीत्या कॅच पकडला आणि उत्तम टीम वर्कचे उदाहरण दिले. पहा व्हिडिओ:
मॅक्ग्राने ब्रिस्बेनची स्टार खेळाडू अमेलिया केरचा सर्वोत्कृष्ट झेल पकडला आणि तिला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय बनला आहे. ब्रिस्बेन हीटला विजयासाठी 17 चेंडूत 35 धावांची गरज असताना ही घटना घडली. या सामन्यात स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हीट संघ 135 धावाच करू शकला आणि सामन्यात ब्रिस्बेन हीटला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. ज्याने Catches Win Matches ही म्हण पुन्हा एकदा सिद्ध केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)