Champions Trophy 2025: 'भारताशिवाय खेळू', चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर पाकिस्तानी गोलंदाजाच्या विधानाने उडाली खळबळ! पाहा व्हिडिओ
हसन अली म्हणाला की, आम्ही जर भारतात जात आहोत तर त्यांनीही पाकिस्तानात यावे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.
Hasan Ali On India In Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) बाबत बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी (PCB) यांच्यात वाद सुरूच आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, मात्र टीम इंडियाने (Team India) पाकिस्तान (Pakistan) दौरा करण्यास नकार दिला आहे. तर पीसीबीने हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हसन (Hasan Ali) अली याने मोठे विधान केले असून आम्ही भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू, असे म्हटले आहे. हसन अली म्हणाला की, आम्ही जर भारतात जात आहोत तर त्यांनीही पाकिस्तानात यावे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. (हे देखील वाचा: Rohit Sharma ODI Stats In Sri Lanka: श्रीलंकेच्या भूमीवर रोहित शर्माची सुपरहिट कामगिरी, पाहा 'हिटमॅन'ची रंजक आकडेवारी)
खेळाला राजकारणापासून दूर ठेवावे
समा टीव्हीशी बोलताना हसन अली म्हणाला, "जर आपण तिथे (भारतात) खेळणार आहोत, तर त्यांनीही पाकिस्तानात यावे. अनेकांनी अगणित वेळा म्हटले आहे की, खेळाला राजकारणापासून दूर ठेवावे. पण जर आपण पाहिले तर वेगळ्या कोनातून, अनेक भारतीय खेळाडूंनी मुलाखतीत सांगितले की त्यांना पाकिस्तानमध्ये खेळायचे आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आमची स्वतःची धोरणे, देश आणि बोर्ड आहे.
भारताला यायचे नसेल तर आम्ही त्यांच्याशिवाय खेळू
पुढे पाकिस्तानी वेगवान गोलंदाज म्हणाला, "आमच्या चेअरमनने म्हटल्याप्रमाणे, जर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असेल तर ती पाकिस्तानातच होणार आहे. जर भारताला यायचे नसेल तर आम्ही त्यांच्याशिवाय खेळू. क्रिकेट व्हायला हवे. पाकिस्तानमध्ये खेळले आणि जर भारत "जर तुम्हाला भाग घ्यायचा नसेल तर याचा अर्थ असा नाही की क्रिकेट संपले आहे. भारताशिवाय इतर अनेक संघ आहेत."
आशिया चषक 2023 बाबतही झाला होता वाद
याआधी आशिया कप 2023 बाबत बराच वाद झाला होता, त्यानंतर हा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात आला होता. भारताने आशिया कप 2023 चे सर्व सामने श्रीलंकेत खेळले, परंतु यावेळी पीसीबीने हायब्रिड मॉडेलला स्पष्टपणे नकार दिला आहे.
टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तानला 2008 मध्ये दिली होती भेट
टीम इंडियाने शेवटचा आशिया कपसाठी 2008 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. आधी टीम इंडियाने पाकिस्तानला जाणे बंद केले आणि नंतर हळूहळू दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकाही थांबली.