मँचेस्टर एअरपोर्टवर माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रम यांचा अपमान, जाणून घ्या धक्कादायक कारण
अक्रम यांनी सांगितले की विमानतळ व्यवस्थापनाने त्यांच्या मधुमेहावरील औषधांची योग्य काळजी घेतली नाही.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम (Wasim Akram) यांनी मँचेस्टर (Manchester) विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अक्रम यांनी मंगळवारी सोशल मीडियाद्वारे त्यांच्याबरोबर एअरपोर्टवर घडलेला वाईट अनुभव शेअर केला. अक्रम यांनी सांगितले की विमानतळ व्यवस्थापनाने त्यांच्या मधुमेहावरील औषधांची योग्य काळजी घेतली नाही. मधुमेहाच्या रुग्णांना इंसुलिन कोल्ड केसमध्ये ठेवावे लागते. पण अक्रमला ते काढून टाकून प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवण्यास सांगितले गेले असे त्यांनी सोशल मीडियावर म्हणाले. अक्रम 1997 पासून टाईप 1 मधुमेहाचा उपचार करीत आहेत. त्यावेळी ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि आपल्या करिअरच्या शिखरावर होते. आणि तेव्हा पासून ते दिवसातून अनेक वेळा इंसुलिन इंजेक्शन घेत आहेत.
अक्रम यांनी ट्विट करत लिहिले, "आज मँचेस्टर एअरपोर्टवर मला अत्यंत निराशा झाली, मी जगभरात माझ्या इंसुलिनसह प्रवास करतो पण मला कधीच लाज वाटली नाही. मला अत्यंत अपमानास्पद वाटले. मला कठोरपणे प्रश्न विचारले गेले आणि माझ्या इन्सुलिनला त्याच्या प्रवासाच्या कोल्ड केस मधून काढून आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आले."
53 वर्षांचा अक्रम, इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी (ICC) विश्वचषक स्पर्धेत समालोचक म्हणून आला होता. मधुमेहाने ग्रस्त असूनही, अक्रम यांनी कधीही क्रिकेट खेळणे थांबवले नाही. अक्रम यांनी पाकिस्तानसाठी 104 टेस्ट खेळले आहे. यात त्यांनी 414 विकेट्स घेतले आहे. आणि 356 वनडे क्रिकेट सामने खेळले. यात त्यांनी 502 विकेट्स घेतल्या आहेत. अक्रॅमने आपल्या आहार आणि व्यायामाच्या स्तरांवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवून मधुमेह नियंत्रणात आणले. आज अक्रम यांना जगातील सर्वात मोठा डावखुरा वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातात.