Vitality Blast 2020: पाकिस्तानच्या बाबर आझमचा 'फ्लॉप शो', इंग्लंड क्रिकेट क्लब Gloucestershire ने व्हिडिओ पोस्ट करून केलं ट्रोल
पाकिस्तानच्या मर्यादित ओव्हर टीमचा कर्णधार बाबर आझमने सध्या इंग्लंडमधीलव्हायटॅलिटी ब्लास्ट टी-20 लीगमध्ये सोमरसेटकडून ग्लॉस्टरशायरविरुद्ध सामन्यात 17 चेंडूत 10 धावांचा डाव खेळला. याचा फायदा घेत ग्लॉस्टरशायरने बाबरला ट्विटरवर ट्रोल केले. "केवळ क्रमवारीत अव्वल असण्याला काही महत्त्व नसतं," अशा कॅप्शनसह एका व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला.
पाकिस्तानच्या मर्यादित ओव्हर टीमचा कर्णधार बाबर आझम सध्या इंग्लंडमधील स्थानिक टी20 क्रिकेट स्पर्धेत (व्हायटॅलिटी ब्लास्ट) टी-20 लीगमध्ये सोमरसेटकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात 42 धावांचा डाव खेळल्यापासून बाबरला धावांसाठी संघर्ष करावा लागला आणि पुन्हा एकदा फक्त 10 धावा करता आल्या. ग्लॉस्टरशायरविरुद्ध सामन्यात बाबरने 17 चेंडूत 10 धावांचा डाव खेळला. याचा फायदा घेत ग्लॉस्टरशायरने बाबरला ट्विटरवर ट्रोल केले. सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये बाबरची गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय टी-20 फलंदाजांच्या रँकिंगमध्येही तो बर्याच दिवसांपासून क्रमांकावर होता, पण नुकतच इंग्लंडच्या डेविड मालनने त्याला पछाडले आणि टी-20 चा नंबर एक फलंदाज बनला. बाबर जवळपास वर्षभर अव्वलस्थानी होता, पण अखेर त्याला मालनकडून अव्वलस्थान गमवावे लागले. ग्लॉस्टरशायर क्लबकडून खेळणाऱ्या डेविड पेन, या गोलंदाजाच्या 10 चेंडूत बाबरने केवळ 6 धावा केल्या. त्यामुळे क्लबने बाबरच्या त्या ओव्हरचा व्हिडिओ शेअर केला आणि पाकिस्तानी फलंदाजाला चांगलेच ट्रोल केलं. (ICC T20I Rankings: बाबर आझमला मागे टाकत डेविड मलान अव्वल स्थानी विराजमान, टॉप-10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय)
"केवळ क्रमवारीत अव्वल असण्याला काही महत्त्व नसतं," अशा कॅप्शनसह एका व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये 10 चेंडूत त्याने अनक्रमे 1, 0, 0, 1, 0, 0, 0, 0, 4 अशा धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. पाहा बाबरच्या त्या डावाचा व्हिडिओ:
सामन्याबद्दल बोलायचे तर सोमरसेटला या सामन्यात 11 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 20 ओव्हरमध्ये 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोमरसेटची सुरवात खराब झाली आणि त्यांनी त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज-बाबर आझम आणि स्टीव्हन डेविस, यांची पहिल्या 5 ओव्हर मध्येच विकेट गमावली. ग्लोस्टरशायर गोलंदाजांविरूद्ध सोमरसेटचे फलंदाज टिकू शकले नाही, पण विल सीडच्या प्रयत्नांनी यजमान टीमने लढा दिला. सीडने 49 चेंडूत 82 धावांचा डाव खेळला. रेयान हिगिन्स आणि डेविड पेन यांनी अनुक्रमे 3 आणि 2 गडी बाद केले. दुसरीकडे, पाकिस्तानी टीमच्या इंग्लंड दौऱ्यानंतर सोमरसेट क्लबसोबत सामील झालेल्या बाबरने यापूवी सामन्यांमध्ये 6,0 आणि 10 अशा धावा केल्या. बाबर लवकरच पाकिस्तानाला रवाना होणार असून तेथे तो झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तयारी करेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)