टीम इंडिया प्रशिक्षक प्रकियेत विराट कोहली याचे वजन घटले, BCCI ने दाखवला बाहेरचा रस्ता

बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीला निवड प्राक्रियेतून बाहेर केले आहे. म्हणजे नवीन प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांची निवड करताना कोहलीची आवड-निवड विचारात घेतली जाणार नाही.

विराट कोहली (Photo Credits: Getty)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) ने क्रिकेट टीमसाठी नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहे. पण यंदा त्यांची निवड प्रक्रिया ही पहिल्यासारखी नसणार आहे. भारतीय संघाचा पुढचा कोच कोण असणार याची शोध करत असताना बीसीसीआय ने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला निवड प्राक्रियेतून बाहेर केले आहे. म्हणजे नवीन प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांची निवड करताना कोहलीची आवड-निवड विचारात घेतली जाणार नाही.  (विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात फूट? संघ व्यवस्थापनाने दिले हे स्पष्टीकरण)

कोचच्या निवडबाबत इंडियनएक्सप्रेस मधील एका रिपोर्टनुसार, यंदा नव्या कोच निवडीसंदर्भात विराटचे मत विचारात घेतले जाणार नाही. 2007मध्ये जेव्हा रवी शास्री (Ravi Shastri) यांची निवड करण्यात आली होती तेव्हा विराटचे मत विचारात घेतले गेले होते. पण यावेळी अंतिम निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हेच घेतील. आणि त्यानंतर प्रशासकिय समिती यावर शिक्कामोर्तब करेल. 2017 मध्ये विराटने अनिल कुंबळे (Anil Kumble) सोबत काम करण्यास हरकत दाखवल्याने त्यांना त्या पदावरून हटवण्यात आले होते.

दरम्यान, कोच पदासाठी बीसीसीआयने मंगळवारी मुख्य कोचसह अन्य सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले होते. यासाठी त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहे. संबंधित पदासाठी इच्छुक उमेदवार 30 जुलै 2019 पर्यंत अर्ज पाठवू शकतात.