हार्दिक पांड्याच्या Koffee with Karan शो मधील व्यक्तव्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रीया

गेल्या काही दिवसांपासून कॉफी विथ करणमधील क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे वादग्रस्त विधानांमुळे वाद रंगला आहे.

Indian Cricket Team Captain Virat Kohli | File Image| (Photo: Getty Images)

गेल्या काही दिवसांपासून 'कॉफी विथ करण 6'(Koffee with Karan 6) मधील क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वादग्रस्त विधानांमुळे वाद रंगला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं की, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुलवर (KL Rahul) दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घालण्याची शिफारस होऊ लागली. या सर्व प्रकरणावर प्रथमच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) प्रतिक्रीया दिली आहे. माध्यमांशी बोलताना विराटने सांगितले की, "आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि जबाबदार खेळाडू म्हणून हार्दिकच्या व्यक्तव्याच्या बाजूने नाही. ते त्याचे वैयक्तिक मत आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत."

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण शो' मध्ये ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी महिलांबद्दल काही व्यक्तव्ये करण्यात आली. त्यानंतर टीका, ट्रोलिंगला पांड्याला सामोरे जावे लागेल. चूक उमगल्याने त्याने ट्विटरवरुन माफीही मागितली. मात्र प्रकरण वाढत गेले आणि BCCI ने दोघांनाही नोटीस पाठवली. नोटीसचे उत्तर देतानाही पांड्याने माफी मागत पुन्हा अशी चूक होणार नसल्याची कबुली दिली. तरीही त्या दोघांवर दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यांत खेळण्यात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif