Forbes 2020 च्या यादीत स्थान पटकावणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू, जाणून घ्या त्याची कमाई

फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव क्रिकेटर म्हणून स्थान पटकावून विराटने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे

विराट कोहली (Photo Credits: Facebook/@RCB)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव क्रिकेटर म्हणून स्थान पटकावून विराटने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. फोर्ब्स 2020 च्या यादीत स्थान पटकवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. विराटचं वार्षिक उत्पन्न हे 26 Million अमेरिकन डॉलर्स एवढं असून यातील 24 Million अमेरिकन डॉलर्स एवढं उत्पन्न विराटला जाहीरातींमधून मिळतं. मागील वर्षी याच यादीच विराट 100 व्या स्थानावर होता.

Forbes 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या 100 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 साली जाहीर करण्यात आलेल्या यादीत विराट 83 व्या स्थानावर होता. मात्र 2020 मध्ये मात्र चांगली कमाई करत विराटने 66 व्या स्थानावर झेप घेतली आहे. Coronavirus: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुख्यमंत्री आणि PM-CARES ला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी केली आर्थिक मदतीची घोषणा

स्व्सित्झर्लंडचा टेनिस रोजर फेडरर याने सर्वाधिक कमाई करत फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. मागील वर्षी त्यांची कमाई 106 मिलियन डॉलर इतकी होती.

विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि प्रधानमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे जाहीर केले. विराटने याबाबत ट्विट करून माहिती दिली.