Virat Kohli ने T20I क्रिकेटमध्ये षटकारांचे ठोकले शतक, अशी कामगिरी करणारा ठरला तो दुसरा भारतीय खेळाडू

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो 17 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. विराट कोहलीने T20I क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 षटकारही पूर्ण केले आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा विराट कोहली हा भारताचा दुसरा क्रिकेटर आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा तो जगातील 10वा खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो 17 वा क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत भारतातील अनेक खेळाडूंची नावे आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराज सिंह, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी 250 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीने आशिया चषक 2022 च्या सुपर 4 मधील त्याच्या तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या डावातील दुसरा षटकार मारला. त्याचप्रमाणे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या षटकारांची संख्या 100 झाली आहे. विराटने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 300 हून अधिक चौकारही मारले आहेत. (हे देखील वाचा: IND vs PAK: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामना हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा ठरला T20 सामना)

3500 धावाही केल्या पूर्ण 

विराट कोहलीने या सामन्यात 38वी धावा करताच, तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा करणारा दुसरा पुरुष क्रिकेटपटू ठरला. त्याच्या आधी रोहित शर्माने या स्पर्धेत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा आकडा आपल्या नावावर केला होता. तथापि, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या 3500 धावा न्यूझीलंडची महिला क्रिकेटर सुझी बेट्सने केल्या होत्या.