Vijay Hazare Trophy 2021 स्पर्धेत Shardul Thakur याचा सुपर शो, मुंबईची विजयी घोडदौड कायम, हिमाचल संघाचा 200 धावांनी उडवला धुव्वा
शार्दुलने बॅटने ताकद दाखवली आणि केवळ 57 चेंडूत 92 धावा फटकावल्या ज्यामुळे मुंबईने हिमाचल प्रदेशला 200 धावांनी पराभूत करत स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली.
Vijay Hazare Trophy 2021: चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सोमवारी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) संघाविरुद्ध विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) सामन्यात मुंबई (Mumbai) संघ अडचणीत असताना लिस्ट A क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. शार्दुलने बॅटने ताकद दाखवली आणि केवळ 57 चेंडूत 92 धावा फटकावल्या ज्यामुळे मुंबईने 9 विकेट गमावून 321 धावांपर्यंत मजल मारली. शार्दुलने अवघ्या 39 चेंडूंत लिस्ट A क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले आणि अखेर 57 चेंडूच्या खेळीत 6 चौकार आणि षटकारांसह साथीदारांचे मनोरंजन केले. हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज पंकज जसवालने शार्दुलला डावात फक्त दोन ओव्हर शिल्लक असताना बाद केले. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 91 धावांची शानदार खेळी केली. आदित्य तरे याने 83 धावा केल्या आणि शार्दुलसह मुंबईचा डाव सावरण्याचा महत्वपूर्ण भूमिका बजावली. (Vijay Hazare Trophy 2021: दिल्ली येथे होणार विजय हजारे ट्रॉफीच्या Knockouts सामन्यांचे आयोजन, 7 मार्चपासून होणार सुरुवात)
लक्ष्याचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशचा डाव 24.1 ओव्हरमध्ये 121 धावांवर संपुष्टात आला. हिमाचल प्रदेशकडून मयंक डागरने 20 चेंडूत चार चौकार व तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. यासह, सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या एलिट गट डी सामन्यात शार्दुल, सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांच्या शानदार डावामुळे मुंबईने हिमाचल प्रदेशला 200 धावांनी पराभूत करत स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. मुंबईने दिल्ली, महाराष्ट्र, पुडुचेरी आणि राजस्थानविरुद्ध आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवला होता. हिमाचलकडून प्रशांत सोलंकीने चमकदार कामगिरी केली आणि 31 धावा देत 4 विकेट घेतल्या. यशस्वा जयस्वाल, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची स्थिती 8/3 अशी झाली होती. त्यांनतर, सरफराज खान चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरल्यावर मुंबईची स्थिती 49/4 अशी झाली.
त्यानंतर हिमाचलपुढे सूर्यकुमारने डाव सावरणे सुरु केले आणि 75 चेंडूत 91 धावांच्या खेळीत 15 चौकार ठोकले. अनुभवी तरेच्या रूपात त्याला एक सक्षम भागीदार मिळाला आणि दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली. 31व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार बाद झाल्यावर तरे आणि शार्दुल यांनी सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली कारण त्यांनी हिमाचल गोलंदाजांचा सामना केला. हिमाचलसाठी ऋषी धवनने 84 धावांवर4 विकेट तर पंकज जसवालने 65 धावांवर मुंबईच्या 3 फलंदाजांना बाद केले.