अष्टपैलू रवींद्र जडेजाने तलवारबाजी करून दाखविला 'बाहुबली' अवतार; माइकल वॉनने केले ट्रोल तर डेविड वॉर्नर झाला चकित, पाहा Video

जडेजाच्या तलवारबाजीने फक्त त्याच्या चाहत्यांना केवळ प्रभावित केलेच शिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नरनेही याचे कौतुक केले. पण, इंग्लंचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी मात्र त्याची खिल्ली उडवली.

माइकल वॉनने रवींद्र जडेजाला केले ट्रोल (Photo Credits : Getty Images / Instagram)

टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या तलवारबाजीचा एक व्हिडिओ पोस्ट केला, जो खूप पसंत केला जात आहे. जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतातील 21 दिवसांचा लॉकडाउन पुढे वाढवण्यात आला आहे. यामुळे सर्वांना अजून काही दिवस घरी बसावे लागणार आहे. जडेजा देखील त्याच्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहे. जडेजाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की "तलवारीने एकदा आपली चमक गमावली परंतु ती नेहमी त्याच्या मास्टरच्या आज्ञेचे पालन करते." व्हिडिओमध्ये जडेजा चांगलीच तलवारबाजी करत आहे. त्याचे हे रूप यूजर्सना खूप पसंत पडले आहे. जामनगर येथे जन्मलेल्या जमेजाने एका मुलाखतीत सांगितले की तो हे राजपूत स्टाईलमध्ये करतो. (डेविड वॉर्नरला बॅटने स्वतः सारखी तलवारबाजी करताना पाहून रवींद्र जडेजा ने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video)

या व्हिडिओमध्ये 'बाहुबली' चित्रपटातील गाणंही ऐकले जाऊ शकते. जडेजाच्या तलवारबाजीने फक्त त्याच्या चाहत्यांना केवळ प्रभावित केलेच शिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नरनेही (David Warner) याचे कौतुक केले. वॉर्नरने जडेजाच्या व्हिडिओवर हसणार्‍या ईमोजीचा वापर करून "किती चांगले" अशी टिप्पणी केली. पण, इंग्लंचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी मात्र त्याची खिल्ली उडवली. वॉन यांनी टिप्पणी विभागात एक मजेदार टिप्पणी करत लिहिले, "तुमच्या लॉनला मॉवरची आवश्यकता आहे." पाहा जडेजाचा बाहुबली अवतार:

वॉर्नरची प्रतिक्रिया

वॉनची टिप्पणी !!

याआधी वॉर्नरने आपल्या फलंदाजीद्वारे जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल केली होती. तथापि, व्हिडिओ मागील वर्षी एका जाहिरातीच्या शूट दरम्यान शूट करण्यात आला होता. जडेजाने या पोस्टवर टिप्पणी केली आणि लिहिले की "हाहााहा... जवळजवळ डेविड." जडेजाच्या तुलनेत त्याने कसे केले याविषयी वॉर्नरने चाहत्यांना त्यांचे मत देण्यास सांगितले. केवळ जडेजाच नाही तर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर फलंदाज रिद्धिमान साहानेही वॉर्नरच्या तलवार सेलिब्रेशनवर प्रतिक्रिया दिली.