‘इंदिरा नगर का गुंडा हूं मैं’! Venkatesh Prasad याला पाकिस्तानी फॅनने केले ट्रोल, माजी भारतीय गोलंदाजाने केली बोलती बंद, पहा व्हायरल Tweet
माजी भारतीय दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा अलीकडील जाहिरातीतील 'इंदिरा नगर का गुंडा' डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. द्रविडचा माजी संघाचा सहकारी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी रविवारी ट्विटरवर पाकिस्तानचा माजी फलंदाज आमीर सोहेलवर 'इंदिरा नगर का गुंडा' डायलॉगचा संदर्भ घेऊन निशाणा साधला.
Venkatesh Prasad Mocks Aamer Sohail: माजी भारतीय दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा (Rahul Dravid) अलीकडील जाहिरातीतील 'इंदिरा नगर का गुंडा' (Indira Nagar Ka Gunda) डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. द्रविडचा माजी संघाचा सहकारी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी रविवारी ट्विटरवर पाकिस्तानचा माजी फलंदाज आमीर सोहेलवर (Aamer Sohail) 'इंदिरा नगर का गुंडा' डायलॉगचा संदर्भ घेऊन निशाणा साधला. 1996 विश्वचषकातील भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) लढत दरम्यान प्रसादने सोहेलसोबतच्या आपल्या प्रसिद्ध फेस-ऑफचा फोटो शेअर केला. पाकिस्तानच्या धावांचा पाठलाग करताना सोहेलने प्रसादकडे पाहून बाउंड्री लाईनच्या दिशेने आपली बॅट निर्देशित केली तेव्हा दोघांच्यात जोरदार ‘सामना’ पाहायला मिळाला. मात्र, पुढच्याचा चेंडूवर प्रसादने सोहेलचे त्रिफळा उडवला आणि बदल घेतला.
प्रसाद यांनी ट्विटरवर लिहिले की, “बेंगलोरमध्ये मी आमिर सोहेलला 14.5 मध्ये दिरा नगरका गुंडा हूं मैं.” पाकिस्तानी क्रीडा सादरकर्त्याने प्रसादच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना टीका केली आणि म्हणाले की, सोहेलसोबतची घटना ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एकमेव यश आहे. यावर माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने सडेतोड उत्तर देत पाकिस्तानच्या क्रीडा सदारकर्त्याची बोलती बंद केली. “प्रसादच्या कारकिर्दीतील एकमेव कामगिरी,”स्वत: चे क्रीडा सादरकर्ते म्हणून वर्णन करणाऱ्या ट्विटर यूजर नजीब उल हसनैनने लिहिले. “नाही नजीब भाई. नंतरसाठी काही कामगिरी राखून ठेवली होती. 1999 मध्ये इंग्लंडमधील पुढच्या विश्वचषकात, मॅनचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्ध 5/27 घेतला आणि त्यांना 228 धावसंख्या गाठता आली नाही. आशीर्वाद दे,” प्रसादने पुढे लिहिले.
दरम्यान, 1996 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे तर व्यंकटेश प्रसादने 10 ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या आणि 45 धावा दिल्या. सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाने प्रतिस्पर्धी 287/8 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान फक्त 248/9 धावाच करू शकला आणि 39 धावांनी टीम इंडियाने विजय मिळवला. 1996 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात चॅम्पियन श्रीलंकाकडून पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून शकलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)