USA Beat UAE 2nd T20 2024: दुसऱ्या T20 सामन्यात अमेरिकेचा संयुक्त अरब आमिरातीवर 15 धावांनी विजय; अभिषेक पराडकरने घेतल्या 3 विकेट

अमेरिकेचा फलंदाज सैतेजा मुक्कामल्लाने शानदार 85 धावा केल्या. 54 चेंडूंचा सामना करताना त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. त

UAE National Cricket Team vs USA National Cricket Team 2nd T20 Tri-Series 2024 1st Inning Scorecardसंयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ (UAE) विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ (USA) T20 तिरंगी मालिका 2024 चा दुसरा सामना 30 सप्टेंबर (सोमवार) रोजी विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. आज झालेल्या T20I तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेने UAE समोर प्रथम फलंदाजी करताना 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंरतू संयुक्त अरब आमिरातीला 160 धावा पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे त्यांना 15 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. (हेही वाचा - Oman vs Nepal 2nd T20 2024 Scorecard: नेपाळचा ओमानवर 37 धावांनी विजय, गुलसन झा ठरला सामन्याचा हिरो)

अमेरिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या डावात काही चमकदार वैयक्तिक कामगिरी पाहायला मिळाली. अमेरिकेचा फलंदाज सैतेजा मुक्कामल्लाने शानदार 85 धावा केल्या. 54 चेंडूंचा सामना करताना त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. तथापि, त्याच्या सहकारी फलंदाजांनी त्याला पूर्ण साथ दिली नाही, परिणामी संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या. इतर फलंदाजांमध्ये अँड्रिज गॉसने 17 धावा आणि शायान जहांगीरने 19 धावांचे योगदान दिले. पण, डावात अनेक विकेट पडल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

संयुक्त अरब आमिरातीकडून बासील अहमदला सोडता अन्य कोणालाच मोठी खेळी साकारता आली नाही. बासीलने 26 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 44 धावा केल्या. अमेरिकेकडून अभिषेक पराडकरने 4 षटकांत 24 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर हरमीत सिंग आणि नोसटूस केनिजगे प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. सतेजा मुखमाला यांने 54 चेंडूत केलेल्या 85 धावांच्या पारीमुळे त्याला या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.