IND vs BAN U19 World Cup 2020: कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न भंग, टीम इंडियाला 3 विकेटने पराभूत करत बांग्लादेशने पहिल्यांदा जिंकले अंडर-19 विश्वचषकचे जेतेपद

भारत-बांग्लादेश अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये टॉस गमवून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने 3 विकेटने विजय मिळवला आणि स्पर्धेचे जेतेपद जिंकले. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बांग्लादेशला नियमानुसार सुधारित 170 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी 42.1 ओव्हरमध्ये गाठले.

IND vs BAN U19 World Cup 2020: कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न भंग, टीम इंडियाला 3 विकेटने पराभूत करत बांग्लादेशने पहिल्यांदा जिंकले अंडर-19 विश्वचषकचे जेतेपद
बांग्लादेश अंडर-19 संघ (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

भारत (India)-बांग्लादेश (Banglades)अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) फायनलमध्ये टॉस गमवून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने 3 विकेटने विजय मिळवला आणि स्पर्धेचे जेतेपद जिंकले. बांग्लादेशने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेची फायनल फेरी गाठली आणि पहिल्या प्रयत्नातच जेतेपद मिळवले. पावसाने खेळात व्यत्यय आणला, पण तोवर बांग्लादेशने डकवर्थ-लुईस नियमाने आघाडी घेतली होती. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बांग्लादेशला नियमानुसार सुधारित 170 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी 42.1 ओव्हरमध्ये गाठले. बांग्लादेशकडून सलामी फलंदाज परवेझ हुसेन इमोन (Parvez Hossain Emon) याने संघर्ष केला. इमोन 47 धावांचा डाव खेळला. इमोनला डावाच्या सुरुवातीला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले होते. मात्र, नंतर तो परत आला संघाला विजयाच्या जवळ नेले. इमोनला साथ मिळाली ती कर्णधार अकबर अलीची (Akbar Ali). बांग्लादेशी कर्णधाराने नाबाद 43 धावांचा खेळ केला आणि बांग्लादेशला पहिल्यांदा आयसीसीचे जेतेपद मिळवून दिले. भारताकडून रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याने प्रतिस्पर्धी संघाला फिरकीने चांगले परेशान केले. त्याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, पण पराभव टाळू शकला नाही. अकबर आणि परवेझने नंतर सामनाजवळपास उलटला. रकीबुल हसन (Rakibul Hasan) 25 चेंडूत 9 धावा करून नाबाद राहिला. (यशस्वी जयस्वाल, रवि बिश्नोई यांनी U19 विश्वचषकमध्ये केला प्रभावी खेळ; टूर्नामेंटमध्ये केल्या सर्वाधिक धावा, घेतल्या सर्वात जास्त विकेट्स)

इमोनला बाद करून यशस्वी जयस्वाल ने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण कर्णधार अकबरने कोणताही धोकादायक शॉट न खेळता सावध खेळ केला. बांग्लादेशकडून सलामी फलंदाज परवेझ हुसेनने सर्वाधिक 47 धावा केल्या, तंजीद हसन 17 आणि कर्णधार अलीने धावांचे योगदान दिले. टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण देत बांग्लादेशी गोलंदाजांनी भारताला प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागला, पण त्यांच्या फलंदाजांना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाही. बांग्लादेशने पहिल्यांदा या स्पर्धेची फायनल फेरी गाठली होती. बांग्लादेशच्या सलामी फलंदाजांनी वेगवान सुरुवात केली आणि संघाचा विजय निश्चित वाटत असताना बिश्नोईने अव्वल स्थानावरील फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. बांग्लादेशने आज भारताला स्पर्धेत पहिल्यांदा ऑलआऊट करण्याचा पराक्रम केला आणि इथूनच त्यांच्या ऐतिहासिक विजयाची सुरुवात झाली. भारत-बांग्लादेश या सामन्यापूर्वी अपराजित राहिले, होते पण बांग्लादेशने अखेरपर्यंत एकही सामना गमावला नाही आणि जेतेपद मिळवले. भारताचा हा स्पर्धेतील पहिला प्रभाव ठरला.

यापूर्वी, बांग्लादेशने 177 धावांवर भारताला ऑलआऊट केले. अखेरच्या 13 डावात भारत पहिल्यांदाच ऑलआऊट झाला होता. सलामी फलंदाज यशस्वीशिवाय अन्य कोणताही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही. जयस्वालने 88 धावांची खेळी साकारली. 156 धावांवर चौथी विकेट जमावल्यावर भारताने सात विकेट्ससाठी केवळ 21 धावांवर गमावल्या. दुसरीकडे, यशस्वी आणि बिश्नोईने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली. यशस्वीने सर्वाधिक 400 धावांची नोंद केली, तर रवि बिश्नोईने सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात बिश्नोईने 30 धावांवर 4 विकेट्स घेतल्या. यशस्वीने यंदाच्या स्पर्धेत एक शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 400 धावा केल्या.

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2020 09:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).