IND vs NZ विश्वचषक सेमीफायनल मॅचआधी मोहम्मद शमी कडून अज्ञात महिलेला मेसेज पाठवण्याचा आरोप; पहा वायरल स्क्रीनशॉट्स
भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफाइनल मॅचआधीचा टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकला आहे. इंस्टाग्रामवर, सोफिया नावाच्या एका महिलेने मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले, शमीसारखा लोकप्रिय खेळाडू तिला का संदेश पाठवतोय.
इंग्लंड (England) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford), मॅन्चेस्टर (Manchester) येथील मैदानावर आज भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) या दोन संघात सेमीफाइनलची लढत रंगणार आहे. मात्र, या मॅचआधीचा टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकला आहे. मागील वर्षी शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने त्याच्यावर विवाहाबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी शमीला सर्व बाजूंनी टीका सहन करावी लागली, पण अखेरीस सर्व अडचणींना मत देऊन शमी एक यशस्वी गोलंदाज म्हणून वर आला. यंदाच्या विश्वचषकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, आता एका महिलेने त्याच्यावर आरोप केला आहे की शामी सतत तिला सतत मेसेज पाठवत आहे. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final, Manchester Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅचवर ढगांचे संकट, जाणून घ्या वामान खात्याचा अंदाज)
इंस्टाग्रामवर, सोफिया (Sofia) नावाच्या एका महिलेने मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले, शमीसारखा लोकप्रिय खेळाडू तिला का संदेश पाठवतोय. शामीने इंस्टाग्रामवर या अज्ञात महिलेला शुभ दुपार असा एक मेसेज पाठविला आहे. हे स्क्रीनशॉट लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सध्या ट्विटरवर याबाबत चर्चा सुरू होतेय. काही यूजर्स ने शामीची पत्नी हसीन यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली आणि तर काही जणांनी शामीच्या मेसेजमध्ये काय चूक आहे यावर प्रश्न विचारला.
Shami’s feeling lonely in UK. 😂😭 pic.twitter.com/WwXHSt5Gy7
— Dh (@_xLNc) July 8, 2019
Shami has a history of doing this😂no wonder Hasin Jahan left him https://t.co/2lksKCQWqw
— Prachi Das🇮🇳 (@PrachiNotDesai) July 8, 2019
Ek hi toh msg kiya hai.. aur bol rahi "keepa msging me". Hadd hai attention seeking ki in ladkiyon ki.
— NANA (@WkillerChurchil) July 9, 2019
दरम्यान, यंदाच्या विश्वचषकमध्ये शमीने तुफानी कामगिरी केली आहेत. शमीने भारतासाठी 4 सामने खेळात 14 विकेट्स घेतल्या आहेत. यात एक हॅट-ट्रिकचा समावेश आहे. शमीने अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध मॅचमध्ये हॅट-ट्रिक घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2019 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

