(Photo Credit: ANI)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. विश्वचषक क्रिकेटमधील पहिला सेमीफायनल मुकाबला भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द रद्द झाला होता. आजच्या सामन्यात विजय मिळवत दोन पैकी एका संघाला फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आजच्या सामान्यवर लागले आहे. (भारत विरुद्ध न्यूझीलंड World Cup 2019 Semi-Final Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs NZ मॅच चा LIVE आनंद)

दरम्यान, ब्रिटिश हवामान विभागाने आज आणि बुधवारी मॅन्चेस्टरमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि अधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजल्यापासून 50 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचाच अर्थ नाणेफेक होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात पावसाची बॅटिंग झाली आणि सामना रद्द कारण्यात आला तर उद्याचा, बुधवारी, दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर दोन्ही दिवस पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला तर सरासरीच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

दरम्यान, यंदाच्या विश्वकपमध्ये सर्वाधिक सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. पावसामुळे सामने रद्द झाल्याचा फटका गुणतालिकेत अनेक संघाना बसला आहे. आता विश्वचषकाच्या अंतिम टप्यात पुन्हा एकदा पावसाने खोडा घातल्यास चाहत्यांना राग येणं स्वभाविकच आहे.