Irfan Pathan Helps Cobbler: CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करनला इरफान पठाणकडून आर्थिक मदत, सोशल मीडियावर होतंय कौतुक (See Tweets)

आणि त्याच्या मदतीला माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाण पुढे सरसावला. भास्करनने द न्यू इंडियन एक्स्प्रेसला म्हटले गेल्या आठवड्यात इरफान पठाणने काही पैसे (25,000 रुपये) पाठविले. यातून मी कुटुंबासाठी किराणा सामान विकत घेतले.

सीएसके लोगो, इरफान पठाण (Photo Credit: Twitter/Instagram)

तब्बल अडीच-महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉकचा (Unlock) पहिला टप्पा सुरु आहे. नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असूनही अद्याप क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या नाही, शिवाय इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) भविष्यही अनिश्चित आहे. लॉकडाऊन आणि आयपीएल होत नसल्याने खेळावर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आहे आहे. आयपीएलची प्रसिद्ध फ्रॅन्चायसी चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) मोची काम करणाऱ्या भास्करनवरही (Bhaskaran) असेच संकटाला सामोरे जावे लागले. आणि त्याच्या मदतीला माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाण (Irfan Pathan) पुढे सरसावला. लॉकडाऊनमाडे फूड पॅकेट्स, व्हिटॅमिन सी टॅब्लेटपासून फेस मास्क देण्यापर्यंत इरफान आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण यांनी या जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दर्शविण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. (कोरोनाच्या भीतीमुळे स्लिप लावणार नाही? ICC च्या नव्या मार्गदर्शक सूचनांवर इरफान पठाण ने घेतला आक्षेप)

1993 पासून भास्करन एमए चिदंबरम स्टेडियमवर क्रिकेटचे सामने पाहत आहे. आणि मागील 12 वर्षांपासून तो चेन्नई टीमचा अधिकृत मोची म्हणून जोडला गेला आहे. ESPNcricinfo मधील एक लेख वाचून इरफानला भास्करनबद्दल माहिती मिळाली आणि तेथून त्याने फोन नंबर घेऊन मोचीला फोन केला. सुरुवातीला इरफान त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही परंतु त्याने हार मानली नाही आणि अखेर त्याला यश आले. “मला प्रत्येक सामन्यासाठी एक हजार रुपये मिळायचे आणि सीएसकेच्या खेळाडूंनी माझी चांगली काळजी घेतली. हंगाम संपल्यावर खेळाडू आणि प्रशिक्षक माझ्यापर्यंत पोहचून मला देतात. गेल्या वर्षी मला जवळजवळ 25,000 रुपये मिळाले होते, त्याशिवाय धोनीने मला स्वतंत्रपणे दिले. गेल्या आठवड्यात इरफान पठाणने काही पैसे (25,000 रुपये) पाठविले. यातून मी कुटुंबासाठी किराणा सामान विकत घेतले. कोणतेही काम नसल्याने मी पैसे उधार घेतले होते. क्रिकेट लवकरच परत आला नाही तर मी गेलो," भास्करनने द न्यू इंडियन एक्स्प्रेसला म्हटले.

टीम इंडियाच्या यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही इरफानच्या उदात्त जेस्चरची दखल घेतली आणि ट्विटर पोस्टवर त्यांचे कौतुक केले. यूजर्स देखील इरफानचे कौतुक करत आहे. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

छान

धन्यवाद

चेन्नईस्थित भास्करन स्वत: ला चेपाकचा 'अधिकृत' मोची म्हणतो. तो चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व घरांच्या सामन्यांमध्ये साईड स्क्रीनच्या मागे बसलेला असतो.