Most Catches in Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू, भारतीय दिग्गजांच्या नावावर विश्वविक्रम
भारतीय संघ सप्टेंबरपासून बांगालादेशविरुद्ध कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण त्याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा (Most Catches in Test Cricket) विश्वविक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे ते आपण लेखातून जाणून घेवूया...
मुंबई: सध्या, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे (ICC World Test Championship 2023-25) दिवस सुरु असल्यामुळे सगळे देश कसोटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. श्रीलका विरुद्ध इंग्लंड यांच्याच आज दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासुन सुरुवात झाली आहे. तर शुक्रवारपासून पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्याच कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सप्टेंबरपासून बांगालादेशविरुद्ध कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण त्याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा (Most Catches in Test Cricket) विश्वविक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे ते आपण लेखातून जाणून घेवूया... (हे देखील वाचा: आता WTC फायनलचे ठिकाण बदलणार? आयसीसीचे चेअरमन बनल्यानंतर Jay Shah घेणार मोठा निर्णय)
भारतीय दिग्गजांच्या नावावर विश्वविक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम भारतीय दिग्गज खेळाडू राहुल द्रविडच्या नावावर आहे. आतापर्यंत कोणताही खेळाडू त्याच्या विश्वविक्रमाच्या जवळ जाऊ शकलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर द्रविड या यादीत एका दशकापासून अव्वल स्थानावर आहे. तर भारताव्यतिरिक्त, पहिल्या 5 मध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. यापैकी द्रविडसह केवळ तीन खेळाडूंना 200 हून अधिक झेल घेता आले आहेत. इंग्लंडचा जो रूट हा टॉप 5 मध्ये एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे आणि तोच द्रविडच्या विश्वविक्रमाला धोका निर्माण करतो. द्रविडची बरोबरी करण्यासाठी रूट केवळ 12 झेल कमी आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid)
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने केवळ बॅटनेच नाही तर क्षेत्ररक्षणातही चमत्कार केला होता. 1996 ते 2012 दरम्यान त्याने 164 सामन्यांच्या 301 डावांमध्ये एकूण 210 झेल घेतले.
महेला जयवर्धने (Mahela Jayawardene)
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने द्रविडच्या विक्रमाच्या अगदी जवळ आला होता, पण त्याचा विक्रम मोडण्यात तो चुकला. त्याने 1997 ते 2014 दरम्यान 149 सामन्यांच्या 270 डावांमध्ये 205 झेल घेतले.
जॅक कॅलिस (Jacques Callis)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 1995 ते 2013 दरम्यान 166 सामन्यांच्या 315 डावांमध्ये 200 झेल घेतले.
जो रूट (Joe Root)
इंग्लंडचा टॉप ऑर्डर बॅट्समन जो रूट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीतील तो एकमेव सक्रिय खेळाडू आहे. 33 वर्षीय रूटने 2012 ते 2024 दरम्यान 145 सामन्यांच्या 273 डावांमध्ये 198 झेल घेतले आहेत.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 1995 ते 2012 दरम्यान 168 सामन्यांच्या 328 डावांमध्ये 196 झेल घेतले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)